भुजबळांचा रेफरन्स देऊन शिंदे गटाच्या केसरकरांनी उद्धव ठाकरेंना थेट सूनावलं, ढाल -तलवार चिन्हाबाबत म्हणाले…

| Updated on: Oct 11, 2022 | 8:17 PM

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पाहून असेच वागले तर एकही शिवसैनिक पाठीमागे उभा राहणार नाही, सगळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील अशी ही टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

भुजबळांचा रेफरन्स देऊन शिंदे गटाच्या केसरकरांनी उद्धव ठाकरेंना थेट सूनावलं, ढाल -तलवार चिन्हाबाबत म्हणाले...
Image Credit source: Social Media
Follow us on

समीर भिसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही भुजबळ यांच्या सारखीच. भुजबळ हे बाळासाहेबांना सोडून गेले होते, तसे तुम्ही शिवसेना सोडून कॉँग्रेसबरोबर गेलेला आहात असे म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला लक्ष केले आहे. इतकंच काय तर भुजबळ यांनी जे चिन्ह मशाल वापरलं तेच चिन्ह तुम्हाला मिळालं, म्हणजे भुजबळ आणि तुम्ही सारखेच आहात. उद्धव ठाकरे यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी करत केसरकर यांनी बाळासाहेबांना अटक करण्यासाठी ज्यांनी शपथ घेतली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता ? असा सवाल उपस्थित करून केसरकर यांनी ठाकरे गटाला थेट सूनावलं आहे.

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणारी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावल्यासारखे काम करत आहे.

ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह त्यांना जरी मिळालं असलं तरी ढाल तलवार हे बाळासाहेबांचेच चिन्ह आहे, हिंदुत्वापासून दूर गेलेल्या लोकांची सेना बाळासाहेब यांची शिवसेना राहुच शकत नाही असे ही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पाहून असेच वागले तर एकही शिवसैनिक पाठीमागे उभा राहणार नाही, सगळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील अशी ही टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून तुम्ही हिंदुत्वाकडे या असे आवाहन करत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.

एकूणच ढाल – तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर जूने संदर्भ देऊन, विशेषतः छगन भुजबळ यांचा संदर्भ देत ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी हल्लाबोल केला आहे.