नालासोपारा : व्हॉट्सअॅपवर न्यूड व्हिडीओ कॉल (WhatsApp Video Call) रेकॉर्ड करुन तरुणाला धमकावल्याप्रकरणी दिल्लीच्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीने 50 हजारांची खंडणी मागितली होती. आधी सेक्स चॅट आणि मग न्यूड व्हिडीओ कॉल करण्याच्या मोडस ऑपरेंडीतून कोणी ‘हनी ट्रॅप’मध्ये (Honey Trap) अडकू नये, यासाठी सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. (Delhi Girl booked for WhatsApp Video Call with Nalasopara Man luring into Honey Trap)
50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी
मुंबईजवळच्या नालासोपारा भागतील तरुणाला दिल्लीच्या तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले आणि पैशांची मागणी केली. व्हॉट्सअॅपवर अश्लिल चॅटिंग, मग व्हिडीओ कॉलिंग आणि नग्न अंगप्रदर्शन केले. तरुणालाही ऑनलाईन अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडीओ सेव्ह केले. तरुणाचे अश्लील व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी तरुणीने 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तरुणाच्या तक्रारीवरुन दिल्लीच्या युवतीवर तुळींज पोलीस ठाण्यात आयटी कायद्यासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
नालासोपारा भागातील एका तरुणाची ओळख फेसबुकद्वारे दिल्लीतील एका तरुणीसोबत झाली. त्यानंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. व्हॉट्सअॅपवर अश्लील गप्पांना सुरुवात झाली. एकदा व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करुन तरुणीने तक्रारदार तरुणाला भाग पाडलं. अश्लील पोझमधील त्याचे व्हिडीओ तिने सेव्ह करुन ठेवले.
तरुणाचे आक्षेपार्ह व्हिडीओ मित्रांना
त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची मागणी केली. तरुणाने सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावले. त्यामुळे तरुणीने त्याचे फोटो काढून त्याच्या काही मित्रांनाही पाठवले. शेवटी हताश होवून, तरुणाने तुळींज पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुळींज पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करुन तरुणीचा शोध सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?
भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…
(Delhi Girl booked for WhatsApp Video Call with Nalasopara Man luring into Honey Trap)