देवगिरीतून फोन गेला, अन् 7 अपघातग्रस्तांचे प्राण बचावले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्परता

| Updated on: Jul 12, 2023 | 8:58 PM

अपघाताची माहीती मिळताच तावरे यांनी रात्री दोनच्या सुमारास उपमुख्यमंत्री यांच्या देवगिरी बंगल्यावर तातडीने फोन केला.

देवगिरीतून फोन गेला, अन् 7 अपघातग्रस्तांचे प्राण बचावले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्परता
ajit pawar
Image Credit source: socialmedia
Follow us on

बारामती : दोन गाड्यांमधून बारामतीचे आठ तरूण गोव्याला निघाले होते. शनिवारी पहाटे एकच्या सुमारास या तरुणांच्या कारना पोलादपूर घाटात पाठून येणाऱ्या भरधाव टॅंकरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. मोठी दुर्घटना घडल्याने जखमी झालेल्या तरुणांना काही सुचेना. इतक्यात त्यांनी एका कार्यकर्त्यांच्या घरी फोन लावला, कार्यकर्त्याने रात्री दोन वाजता देवगिरी निवास स्थानी फोन केला. आणि तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा देत वेळेत मदत पोहचविण्याचा व्यवस्था केली.

बारामतीहून आठ युवक दोन कारमधून गोव्या फिरण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलादपूर जवळ त्यांच्या कारना पाठीमागून टॅंकरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात माळेगावचे रहिवासी दत्तात्रय शरद टेके ( 43 ) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचे सहकारी घाबरले. त्यांना काय करावे हे सूचेना लगेच त्यांनी माळेगावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांना तातडीने संपर्क केला आणि मदतीची मागणी केली.

अपघाताची माहीती मिळताच तावरे यांनी रात्री दोनच्या सुमारास उपमुख्यमंत्री यांच्या देवगिरी बंगल्यावर तातडीने फोन केला. अजित पवार यांना अपघाताची माहीती कळविण्यात आली. आणि मदतीची मागणी करण्यात आली. अजित पवार यांनीही झोपेतून उठून तातडीने बारामतीकरांच्या मदतीसाठी शासन यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे तरुणांपर्यंत शासकीय मदत पोहचली.

पहाटेपर्यंत अजित पवार यांची तत्परता

वैद्यकीय मदत पोहचण्याच्या आतच गंभीर जखमी झालेल्या माळेगावचे दत्तात्रेय टेके यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या अपघातातील इतर जखमी तरुणापर्यंत मदत पोहचून त्यांचे प्राण वाचले. अजित पवार या घटनेची माहीती फोनवरुन घेत होते. त्यांनी अपघातात किरकोळ मार लागलेल्या तरुणांना पुढील वैद्यकीय मदत पोहचविण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. या घटनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवेदनशील मनाचा हळवा कोपरा पुन्हा एकदा जाणवला.