पुणे : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing Koshyari ) यांनी उद्धव ठाकरे यांनी मला 12 आमदारांच्या नियुक्तीचे पत्र दिले ते धमकी वजा पत्र असल्याचा खळबळजनक आरोप केल्याचे समोर आले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्र अजित पवार यांनी लिहीलेलं नाही तर ते पत्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी लिहीलेलं होतं, तसेच माजी राज्यपालांनी सांगितलं ते योग्यच आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. खरंतर गेल्या काही दोन वर्षांपासून विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशातच भगतसिंह कोश्यारी यांनी विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामध्ये म्हंटलय 12 आमदारांची यादीसोबत जे पत्र दिले ते धमकी वजा पत्र होतं. 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी जे पत्र दिलं त्यातून मला धमकी देण्यात आली होती.
असा खळबळ जनक दावा करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला त्यामुळे 12 आमदारांची नियुक्ती केली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यासाठी जो फॉरमॅट असायला हवा त्याची मागणी राज्यपाल यांनी केली होती.
ज्यावेळी तिन्ही पक्षांचे नेते राजभवन येथे भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते तेव्हा राज्यपालांनी त्यांना सल्ला दिला होता. अशा धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा.
तेव्हा त्यांचाही इगो होता त्यामुळे त्यांनी आम्ही बदलणार नाही असं सांगितलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना सुरू असतांनाच 12 आमदारांचा मुद्दा हा देखील एक विषय समोर आला होता. त्यावरू महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा सामना अधिकच रंगला होता.
तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन खुलासा केला आहे. त्यामुळे राज्यातील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारही गेलं आणि राज्यपालही बदलले गेले तरी देखील 12 आमदारांचा विषय प्रलंबित आहे. महाविकास आघाडीच्या काळात अनेकदा 12 आमदारांच्या नावात बदल करण्यात आल्याचे राज्यपाल यांनी म्हंटले होते.
इतकंच काय हे पत्र देत असतांना 15 दिवसांची मुदत देत मुख्यमंत्री मला आदेश देत होते. त्यामुळे मला त्यांनी धमकी दिल्याने मी त्या नावांची नियुक्ती केली नाही असे जाहीर बोलून टाकले आहे.
राज्यपाल यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लागवला आहे. एकूणच यावर उद्धव ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.