अखेर बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकूण ३९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. ज्यात ३३ जणांनी कॅबिनेटची तर ६ जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची टीम वेगळी आहे. सत्तेचा चेहराच नाही तर मंत्रिमंडळाची संख्या आणि स्वरुप देखील बदलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात सहकारी पक्षांना सामावून घेण्यासोबत जातीय समीकरण आणि प्रादेशिक बॅलन्स देखील सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे..अनेक दिग्गजांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची संख्या ४२ झाली आहे.महाराष्ट्रात कमाल ४३ मंत्री बनविता येतात, रविवारी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामुळे एका कॅबिनेट मंत्री पदाची जागा रिक्त आहे. फडणवीस यांच्या सरकारात चार महिलांना संधी मंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. यात भाजपाच्या कोट्यातून तीन आणि एनसीपीच्या कोट्यातून एक अशा चार महिला मंत्री झाल्या आहेत. शिंदे गटातून एकही महिला मंत्री...