मुंबई: राज्यातील आघाडी सरकार (mahavikas aghadi) चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही. त्यामुळेच आपल्याला असे चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागत आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मी मुंबई अभियान आणि शिव कल्याण केंद्राच्यावतीने मोबाईल दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते या मोबाईल दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. चालता फिरता दवाखाना सुरू होत आहे. दक्षिण मध्य मुंबईत या व्हॅन रोज जाणार आहेत. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित डॉक्टर असतील. लोकांच्या दारापर्यत हे काम होणार आहे. रुग्ण सेवेचे महत्त्व आपण पाहिलेच आहे. कोविड काळात मुंबईत (mumbai) एकाच बेडवर पेंशट आणि रुग्ण आपण पाहिले. त्यामुळेच मोबाईल दवाखाने उपयोगी ठरणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
आरोग्य सेवेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे हा खर्च लोकांना परवडत नाहीये. अधिवेशनात आम्ही सरकार आणि पालिका दवाखान्याची परिस्थिती पाहिली. पालिका मागील वर्षात एकही औषध विकत घेऊ शकले नाही. जेजेमध्ये देखील पॅरासिटीमॉल बाहेरून घ्यावी लागत आहे. त्यामुळे सामान्य माणसाची परवड होत आहे. रुग्ण सेवेवर खर्च करण्यापेक्षा चौक सुशोभीकरणावर खर्च करून मलिदा कसा खाता येईल हे सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महात्मा फुले जनआरोग्य योजना देखील वापरण्यात आली नाही. गरिबांना कोणताही फायदा या सरकारच्या काळात झाला आहे. राज्य सरकारची परिस्थिती असताना केंद्राच्या सर्व योजना पोहोचत आहेत. गरिबांना कोणताही फायदा या सरकारच्या काळात झाला नाही. राज्य सरकारची परिस्थिती असताना केंद्राच्या सर्व योजना पोहोचत आहेत. भाजपने गावागावात प्रसिद्ध आरोग्य दूत तयार करण्याचे काम केले आहे, असंही त्यांनी सांगितलं. मन की बातमध्ये मोदींनी जी प्रेरणा देणारी वक्तव्य केली त्यातून प्रसाद लाड यांनी प्रेरणा घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
राज्य बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व, भाजपला धोबीपछाड
Maharashtra News Live Update : देशातल्या धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही, शरद पवार कडाडले