देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी आपला प्रवास नागपूरचे नगरसेवक ते महापौर म्हणून सुरु केला होता. २२ जुलै १९७० मध्ये नागपूरात जन्मलेले देवेंद्र फडणवीस यांना २२ व्या वर्षी साल १९९२ मध्ये राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरात झाले होते.नागपूरातील शंकर नगर स्थित सरस्वती विद्यालयात त्यांचे दुसऱ्या इयत्तेपासून प्राथमिक शिक्षण सुरु झाले. त्याआधी नागपूरच्या इंदिरा गांधी कॉन्व्हेट शाळेत त्यांना घातले होते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये इमर्जन्सी लागू केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे त्यांच्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल चीड होती. फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून आपले नाव काढायला भाग पाडले आणि सरस्वती शाळेत प्रवेश घेतला.
फडणवीस यांचे बालपणीचे मित्र डॉ. निशित विजय, विवेक मिश्रा, मुकुल बरानपुरे यांनी सांगितले की अभ्यासात देवेंद्र सर्वसाधारण विद्यार्थी होते. शाळेपासून एक किलोमीटरवर त्यांचे घर होते. कधी सायकलवरुन तर कधी ते पायी शाळेत जात. ते वर्गात पाठच्या बाकावर बसायचे. त्यांची वर्गमित्रांशी घट्ट मैत्री होती. त्यामुळे मित्रांच्या चुकीमुळे त्यांनाही मार बसायचा असे त्याचे मित्र सांगायचे. फडणवीस यांच्या मित्रांनी सांगितले की एकदा त्यांच्या मित्रांनी मिळून गॅदरींगमध्ये कॉलेजच्या बाथरुममध्ये सुतळी बॉम्ब फोडले होते. त्यामुळे त्यांना शिक्षा देखील झाली होती. फडणवीस यांना समोसे खूप आवडायचे. एक रुपये पॉकेटमनी मिळायचा. त्यातून ते ५० पैशांचा समोसा खायचे. शाळेच्या शेजारील प्रिती कॉर्नर येथे ते समोसा खायचे. आजही तेथील समोसे खूप प्रसिद्ध आहेत. फडणवीस यांचा स्टाफ येथील समोसे आजही पॅक करुन त्यांच्यासाठी नेतात असे त्यांचे वर्गमित्र सांगतात.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. परंतू ते एकदम सरळ आणि साधे होते,त्यांनी वडीलांच्या पदाचा गैरवापर करीत कधीही गर्व केला नाही. त्यांचे मोठे बंधू आशीष यांना राजकारणात रस होता. ते त्यावेळी गाणी देखील म्हणायचे. फडणवीस यांच्या वर्गमित्रांचे मागे संमेलन झाले तेव्हा फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता या दोघांनी गाणी म्हटली आणि खूप एन्जॉय केले. ते कधीच मस्ती करायचे नाहीत. त्यांच्या मित्रांना शाळेत अनेकदा कोंबडा बनविले होते. परंतू फडणवीस यांना कधी अशा प्रकारची शिक्षा झालेली नसल्याचे त्यांचे मित्र सांगतात. सामुहीकपणे खोडसाळपणा केल्याने मात्र त्यांना शिक्षा झाल्या आहेत.