Devendra Fadnavis: ओबीसी, मराठा आरक्षण ते मेट्रो, शिंदेंच्या नेतृत्वात पूर्ण करु, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा अजेंडा जाहीर केला

| Updated on: Jun 30, 2022 | 5:56 PM

शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ओबीसी, मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावू. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करू. मेट्रोचे काम पूर्ण करू. मोदींनी दिलेल्या विकासाचं पर्व सुरू करू. अडीच वर्ष या विकासाच्या पर्वाला ब्रेक लागला होता, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis: ओबीसी, मराठा आरक्षण ते मेट्रो, शिंदेंच्या नेतृत्वात पूर्ण करु, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा अजेंडा जाहीर केला
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा अजेंडा जाहीर केला
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तानाट्याचा एक अंक संपून दुसरा सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीसांनी मोठी घोषणा केली. भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे फडणवीसांनी जाहीर केले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे असले तरी सरकारचा रिमोट फडणवीसांकडेच असणार आहे. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा अजेंडा (Agenda) जाहीर केला आहे. ओबीसी, मराठा आरक्षण ते मेट्रो सर्व प्रश्न शिंदेंच्या नेतृत्वात मार्गी लावू असे फडणवीस म्हणाले.

शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ओबीसी, मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावू. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करू. मेट्रोचे काम पूर्ण करू. मोदींनी दिलेल्या विकासाचं पर्व सुरू करू. अडीच वर्ष या विकासाच्या पर्वाला ब्रेक लागला होता, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसाहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार आणि काम करणार, असेही फडणवीसांनी नमूद केले.

सायंकाळी 7.30 वाजता शिंदेंचा शपथविधी

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे या आमदारांनी आपला आवाज बुलंद केला. मी त्याला बंड म्हणणार नाही. हे अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे. असे सरकार दीर्घकाळ चालणार नाही हे मी सांगत होतो. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा राज्यापालांकडे दिला आहे. आमचे 106 आणि त्यांचे समर्थक आणि अपक्षांचं पत्रं आम्ही दिलं आहे. संध्याकाळी 7.30 वाजता शिंदे यांच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. आज एकच शपथविधी होणार. त्यानंतर सर्व कार्यवाही करू, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय वैध मानले जाणार नाही

आघाडीने विकासाची कामे केली नाही. भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये जाणं ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरुंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. रोज सावरकर हिंदुत्वाचा अपमान. ठिक आहे. शेवटच्या दिवशी संभाजी नगर झालं. पण कधी ? राज्यपालांचं पत्रं आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर, धाराशीव, दिबा पाटील हे निर्णय घेतले. अर्थात हे निर्णय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहेत. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis stated the agenda of the Chief Minister in the press conference)