Maharashtra CM Swearing-in LIVE: महाराष्ट्रात आजपासून ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात, शिंदे-अजितदादांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

| Updated on: Dec 06, 2024 | 10:04 AM

Maharashtra New Chief Minister Devendra Fadnavis Oath Taking Ceremony LIVE Updates: महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यासाठी अनेक दिग्गज आझाद मैदानात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra CM Swearing-in LIVE: महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात, शिंदे-अजितदादांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
Follow us on

Devendra Fadnavis Oath Taking Ceremony LIVE Updates : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. 230 जागा मिळवत महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक जिंकली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस झाल्यानंतर आता आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. काल भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जात सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या सोहळ्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Dec 2024 05:46 PM (IST)

    Maharashtra DCM Swearing-in LIVE : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

    Maharashtra DCM Swearing-in LIVE : अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.  या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

  • 05 Dec 2024 05:43 PM (IST)

    Maharashtra CM Swearing-in LIVE : एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

    Maharashtra CM Swearing-in LIVE : एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.


  • 05 Dec 2024 05:37 PM (IST)

    महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात, फडणवीसांनी २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला.

  • 05 Dec 2024 05:34 PM (IST)

    महाराष्ट्रात ‘देवेंद्र’पर्व, पंतप्रधान मोदी दाखल, शपथविधी सोहळा सुरु

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आझाद मैदानातील व्यासपीठावर दाखल झाले आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे.

  • 05 Dec 2024 05:23 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आझाद मैदानातील मंचावर दाखल

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मंचावर दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर दाखल होताच मंचावर शपथविधी पार पडेल

  • 05 Dec 2024 05:11 PM (IST)

    नरेंद्र मोदी दाखल होताच शपथविधीला सुरुवात होणार

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी आझाद मैदानात दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यापूर्वी राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल. यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

  • 05 Dec 2024 05:01 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.

  • 05 Dec 2024 04:59 PM (IST)

    शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे त्यांच्या आईंकडून औक्षण

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या आईंकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • 05 Dec 2024 04:55 PM (IST)

    अनेक बॉलिवूड कलाकार शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : अनेक बॉलिवूड कलाकार शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, रणवीर सिंग हे कलाकार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 05 Dec 2024 04:51 PM (IST)

    महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर दाखल होतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

  • 05 Dec 2024 04:48 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात दाखल

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : देवेंद्र फडणवीस आझाद मैदान परिसरात दाखल झाले आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • 05 Dec 2024 04:40 PM (IST)

    एकनाथ शिंदे आझाद मैदानाकडे रवाना, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानावरुन आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवारही आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत.

  • 05 Dec 2024 04:36 PM (IST)

    शपथविधी सोहळ्यासाठी आतापर्यंत कोण-कोण मुंबईत दाखल?

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी आतापर्यंत कोण-कोण मुंबईत दाखल?

    • अमित शाह
    • जे.पी.नड्डा
    • राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा
    • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
    • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
    • आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्माॉ
    • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
    • बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार
  • 05 Dec 2024 04:33 PM (IST)

    मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी अवघे काही मिनिटे शिल्लक दिग्गज दाखल होण्यास सुरुवा

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी अवघे काही मिनिटे शिल्लक आहेत. या शपथविधी सोहळ्याला अनेक मंत्री आझाद मैदानात पोहोचण्यास सुरुवात झाली

  • 05 Dec 2024 04:21 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरुन सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना, बैठक होणार

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : देवेंद्र फडणवीसांचा ताफा सागर बंगल्यावरुन निघाला आहे. ते सह्याद्री अतिथीगृहावर जाणार आहेत. सध्या जे.पी. नड्डा, अमित शाहा हे सह्याद्रीवर उपस्थितीत आहेत. या ठिकाणी महायुतीतील नेतयांची बैठक होणार आहे.

  • 05 Dec 2024 04:18 PM (IST)

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : ते पुन्हा आले, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

    लाडकी बहिणी खूप चांगली योजना आहे. देवेंद्र फडणवीसांनी खूप संघर्ष केला. त्यांनी खूप मोठा काळा संघर्ष पाहिला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, पत्नी अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

  • 05 Dec 2024 04:11 PM (IST)

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : अमित शाह मुंबईत दाखल, विमानतळावर जंगी स्वागत

    उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

  • 05 Dec 2024 04:03 PM (IST)

    Maharashtra CM Swearing-in Ceremony : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी फक्त दीड तास बाकी

    महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी फक्त दीड तास शिल्लक आहे. यानिमित्ताने आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या आझाद मैदानावर दिग्गज पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

  • 05 Dec 2024 04:01 PM (IST)

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी आझाद मैदान येथे होणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहेत.

  • 05 Dec 2024 03:45 PM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत, अमित शहाही पोहचले

    महायुती सरकारच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत पोहोचले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झाले आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मुंबईत पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात आझाद मैदानात मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  • 05 Dec 2024 03:10 PM (IST)

    एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची घेणार, उदय सामंत यांची माहिती

    मोठी बातमी समोर आली आहे. अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबाबतची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं वृत्त होतं. तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाहीत? याबाबत अखेरपर्यंत शंका होती. मात्र आता उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीमुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

  • 05 Dec 2024 03:05 PM (IST)

    शपथविधीसाठी आसनव्यवस्था निश्चित, पहिल्या रांगेत कोण?

    अवघ्या काही वेळातच महायुती सरकराचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाची आसनव्यवस्था निश्चित झाली आहे. या पहिल्या रांगेत फडणवीस कुटुंबिय आणि अंबानी कुटुंबिय बसणार आहेत. त्यांच्यासाठी आसनं राखीव ठेवण्यात आली आहेत.

  • 05 Dec 2024 02:58 PM (IST)

    गुलाबराव पाटील पुन्हा वर्षावर दाखल

    गुलाबराव पाटील पुन्हा वर्षावर दाखल झाले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे.

  • 05 Dec 2024 02:43 PM (IST)

    फडणवीस यांचा शपथविधी, शेतकऱ्यांना युरिया वाटप

    वाशिम शहरातील अनुष्का ऍग्रो कृषी संचालक संतोष वाळके यांनी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या निमित्ताने विशेष उपक्रम हाती घेतला असून त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प करत 500 शेतकऱ्यांना युरिया खतांच्या बॅग आणि नॅनो युरियाचे वाटप करण्यात आलं आहे.

  • 05 Dec 2024 02:34 PM (IST)

    गिरीश महाजन शिंदे यांची भेट घेणार

    भाजप नेते गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर पोहचले आहे. ते शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. आता महाजन फडणवीस यांचा कोणता निरोप शिंदेना देणार त्याबद्दल उत्सुक्ता आहे.

  • 05 Dec 2024 02:29 PM (IST)

    अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू मुंबईत दाखल

    देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू मुंबईत पोहोचले. एनडीए आणि भाजपच्या राज्यातील सर्व मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यास येत आहेत.

  • 05 Dec 2024 02:24 PM (IST)

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत

    देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत पोहोचले.पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाले असून आता महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल.

  • 05 Dec 2024 02:08 PM (IST)

    एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

    शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आमदारांनी आग्रह धरल्यानंतर एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी तयार झाले.

  • 05 Dec 2024 02:06 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी दादा भुसे दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दादा भुसे आणि शिवसेनेचे आमदार वर्षावर आले आहे. एकूण सात आमदार आले आहेत.

  • 05 Dec 2024 12:59 PM (IST)

    ठाणे बेलापूर मार्गावर चार गाड्यांचा अपघात

    कोपरखैरणे येथे एका मागे एक अशा गाड्या धडकल्या आहेत. गाड्याचं नुकसान, कुठलीही जीवितहानी नाही. ठाणे बेलापूर महामार्गावर मात्र काही काळ वाहतूककोंडी.

  • 05 Dec 2024 12:51 PM (IST)

    शपथविधी सोहळ्याआधी अजित पवारांच मोठ स्टेटमेंट

    शपथविधी सोहळ्याला काही तास उरले असताना अजित पवार यांनी एक मोठ स्टेटमेंट केलं आहे. सगळ्यांचा शपथविधी आज व्हायला पाहिजे असं मी म्हणत होतो. पण आज तिघांचा शपथविधी करु असं म्हणालेत. हरियाणा, आंध्रप्रदेशमध्ये सगळ्यांचा शपथविधी एकत्रितच झाला होता असं अजित पवार म्हणाले.

     

  • 05 Dec 2024 12:35 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबी आमंत्रण पत्रिका

    “आज महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे. फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, तर अजितदादा सहाव्यांदा शपथ घेत आहेत याचा आनंद आहे. आज आमच्या इथून हजारो महिला पदाधिकारी आणि लाडक्या बहिणी सोहळ्यासाठी जाणार आहेत. गुलाबी आमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. हसत-खेळत कालची पत्रकार परिषद पार पडली. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, याचा ठाणेकर म्हणून आनंद आहे” असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आनंद परांजपे म्हणाले.

  • 05 Dec 2024 12:17 PM (IST)

    पत्रकारांशी साधणार संवाद

    राज्याचे नावनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथेनुसार ठिक 6.30 वाजता पत्रकार कक्षास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधतील.

  • 05 Dec 2024 11:57 AM (IST)

    संजय गायकवाड वर्षा बंगल्यावर दाखल, एकनाथ शिंदेंची भेट घेणार

    संजय गायकवाड वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.  थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत.  त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा ताफा सह्याद्री अतिथी गृहावर जाणार असून सह्याद्री अतिथिगृहावर देशाचे गृहमंत्री अमित शहा त्याच बरोबर एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

  • 05 Dec 2024 11:50 AM (IST)

    ११ डिसेंबरला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार – सूत्रांची माहिती

    येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 05 Dec 2024 11:26 AM (IST)

    शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात पहिली मंत्रिमंडळ बैठक, महत्त्वाचे निर्णय होणार

    आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.  शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 05 Dec 2024 11:20 AM (IST)

    शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस घेणार श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

    मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी प्रभादेवीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यासोबत देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीचेही दर्शन घेणार आहेत.

  • 05 Dec 2024 11:19 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

    देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिले आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे.

  • 05 Dec 2024 10:59 AM (IST)

    पवार, ठाकरे शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित

    आजच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवार , उद्धव ठाकरे दोन्ही नेते उपस्थित राहणार नाहीत.

  • 05 Dec 2024 10:50 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचा जल्लोष

    अमरावतीत देवेंद्र फडणवीस यांचे मामा चंद्रकांत कलोती यांच्या घरी मिठाई वाटून जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असल्याने कलोती परिवार आनंदी तर मामा चंद्रकांत कलोती यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. मामाच्या परिवाराने दिल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणीस यांनी अमरावतीसाठी आणखी चांगलं काम करावे अशी इच्छा मामांनी बोलून दाखवली. आज कलोती परिवार मुंबईत शपथविधीला हजर राहणार आहे.

  • 05 Dec 2024 10:40 AM (IST)

    शपथविधीसाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने

    देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • 05 Dec 2024 10:30 AM (IST)

    दानवे-भुमरे वाद पेटला

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात दहा कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी बदनामी केल्याप्रकरणी आमदार विलास भुमरे यांनी त्यांना नोटीस दिली आहे. अंबादास दानवे यांनी विलास भुमरे यांच्यावर मारहाण झाल्याचा दावा केला होता. दहा दिवसात भरपाई न दिल्यास न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी स्वरूपाचे खटले दाखल करण्याचा इशारा भुमरे यांनी दानवे यांना दिला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे विरुद्ध आमदार विलास भुमरे यांचा वाद पेटला आहे.

  • 05 Dec 2024 10:20 AM (IST)

    राऊतांकडून अजितदादांचे कौतुक

    सलग ६ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं संजय राऊत यांनी अभिनंदन केले आहे. एक प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच आरक्षण त्यांच्यासाठी ठेवलं आहे अस म्हणता येईल, असा टोला त्यांनी लगावला. उत्तम सहकारी म्हणून अजित पवार यांनी काम केलं आहे. उध्दव ठाकरे देखील अजित पवार यांचं नेहमी कौतुक करतात, असे ते म्हणाले.

  • 05 Dec 2024 10:09 AM (IST)

    शपथविधी सोहळ्यासाठी पोलीस सज्ज

    शपथविधी सोहळ्याची पूर्ण पाहणी केली आहे. कोणत्याही प्रकारे कमतरता भासू नये, आमचा पूर्ण बंदोबस्त तैनात केला आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी उत्तमरीत्या करण्यात येत आहे. हा सोहळा अतिशय सुंदर होईल त्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत, असे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगीतले.

  • 05 Dec 2024 10:01 AM (IST)

    आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी

    आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा आज शपथविधी होईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी विरोधी पक्षांना या शपथविधीला हजर राहण्याचे आवाहन केले. या सर्वांना निमंत्रण धाडल्याचे त्यांनी सांगीतले.

     

  • 05 Dec 2024 10:01 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस घेणार सिद्धिविनायकाचं दर्शन

    आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस सकाळी 11 नंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान उज्जैन मंदिराचे पुजारी प्रविण त्रिवेदी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

  • 05 Dec 2024 09:53 AM (IST)

    दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्यात अजिबात नाही – संजय राऊतांचा एकनाथ शिंदेना टोला

    एकनाथ शिंदे 100 टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्यात अजिबात नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 05 Dec 2024 09:47 AM (IST)

    ही लूट थांबवण्याची जबाबदारी फडणवीसांची आहे – संजय राऊत

    अडीच वर्ष महाराष्ट्राची लूट झाली. ही लूट थांबवण्याची जबाबदारी फडणवीसांची आहे . ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालंय असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 05 Dec 2024 09:39 AM (IST)

    महायुतीच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींची हजेरी, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानात संध्याकाळी पार पडणार आहे.  प्रशासनाकडून या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर हजर राहणार आहेत.  त्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

  • 05 Dec 2024 09:23 AM (IST)

    नाशिक – खेरवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून रेल रोको आंदोलन

    नाशिक निफाडमधील खेरवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून  रेल रोको आंदोलन करण्यात आलं. संतप्त प्रवाशांनी सकाळी 6.15 वाजेपासून राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली. मनमाड-नाशिकमध्ये चोरट्यांकडून प्रवाशांना मारहाण करण्यात आली आहे.  या मारहाणीत एका प्रवाशावर चाकू हल्लाही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
    या चोरट्यांना पकडण्याची मागणी करत संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली होती.

  • 05 Dec 2024 09:14 AM (IST)

    कल्याण – मुंबई एमआयडी पोलिसांच्या पथकावर दगडफेक

    मुंबई एमआयडी पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत
    धक्कादायक प्रकार घडला आहे.

    इराणी वस्तीतील चोरटा तौफिक याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी ही दगडफेक केली . या दगडफेकीमध्ये यशवंत पालवे हे पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 05 Dec 2024 09:03 AM (IST)

    डणवीस यांच्या शपथविधी आधी ठाण्यात झळकले ‘एक हे तो सेफ है’चे बॅनर

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. मात्र त्याआधी ठाण्यामध्ये ‘एक हे तो सेफ है, महाराष्ट्रा आता थांबणार नाही’ ….अशा आशयाचे बॅनर झळताना दिसत आहेत. ठाण्यातून लाडक्या बहिणी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत.

  • 05 Dec 2024 08:57 AM (IST)

    नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश

    नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.  ५ ते १९ डिसेंबर या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात शांतता कायम राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आलेत. महापरिनिर्वाण दिन, राजकीय परिस्थिती आरक्षणासंदर्भातील अंदमाने या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू आहेत. पंधरा दिवसांकरता मनाई आदेश पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू करण्यात आलेत.

  • 05 Dec 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra CM Devendra Fadnavis Swearing : शपथविधी सोहळ्याला साधू महंत हजेरी लावणार

    महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत हजेरी लावणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित केलं आहे. आठ ते नऊ साधू महंत या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. वारकरी संप्रदायासह आखाड्यांच्या महानतांना आणि मठ आणि मंदिरातील महनतांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

  • 05 Dec 2024 08:45 AM (IST)

    फडणवीसांच्या शपथविधीआधी ‘वर्षा’ बंगल्याबाहेर बॅनरबाजी

    देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी ‘वर्षा’ निवासस्थान परिसरात साधू-संतांकडून अभिनंदन बॅनर लावले गेले आहेत. या बॅनरमध्ये फडणवीस यांना ‘धर्मरक्षक’ आणि ‘महाराष्ट्रसेवक’ या विशेषणांनी गौरवले आहे.बॅनर आचार्य श्री नवपद्मसागर सूरीश्वरजी आणि साध्वी मयणाश्रीजी महाराज यांच्या वतीने लावण्यात आले.  या बॅनरमुळे धार्मिक समुदायाचा पाठिंबा आणि राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

  • 05 Dec 2024 08:30 AM (IST)

    एकीकडे फडणवीसांचा शपथविधी, पुण्यात मविआचं आंदोलन

    मुंबईतील आझाद मैदानावर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे. तर त्याचं वेळी पुण्यात महाविकास आघाडीकडून विधान भवन प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात करण्यात येणार असून, पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतील सर्व पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील विधानभवन प्रवेशद्वारावर दुपारी तीन वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

  • 05 Dec 2024 08:15 AM (IST)

    Devendra Fadnavis Oath Taking Ceremony : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह उपस्थित असणार आहेत.