विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं!

| Updated on: Nov 19, 2024 | 9:13 PM

भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता. यावरून मोठा राडा झाला, आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं!
Follow us on

भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता. यावरून आज विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतामध्ये मोठा राडा झाला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जवळपास साडेतीन तास विनोद तावडे यांना घेराव घातला. त्यानंतर सायलेंट पिरिअडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

‘जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो, त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा एक प्रकार आहे. विनोद तावडे आमचे, राष्ट्रीय महामंत्री आहेत, ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला गेले होत, त्यांच्याजवळ कुठलाही पैसा सापडलेला नाही, कुठलीही ऑब्जेक्शनबल वस्तू सापडलेली नाही. उलट त्यांच्यावरच तिथे हल्ला झाला, महाविकास आघाडीचा जो इकोसिस्टम आहे ते कव्हर करण्यासाठी कव्हर फायर केलेला आहे, विनोद तावडे यांनी कुठलेही पैसे वाटले नाहीत, कोनालाही मिळालेले नाहीत’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोतलाना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनिल देशमुख यांनी सातत्यानं या ठिकाणी जसं हिंदी पिक्चर मध्ये सलीम जावेदनच्या स्टोरी अतिशय पॉप्युलर होत्या, तशाच सलीम जावेदच्या स्टोरी चालू केल्या आहेत. पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आहे, त्यात संगळ क्लिअर झालेलं आहे. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की दहा किलोचा गोटा पडला तर कारची काच का तुटली नाही?  एकच गोटा आतमध्ये दिसला, मागची काच फोडून हा दगड मारलेला आहे. हा दगड मागून मारलेला आहे तर मागे लागायला पाहिजे होता तो समोर कसा लागला? असा हल्लाबोल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.