सत्यजित तांबे आणि धीरज देशमुख यांच्याविषयी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं मोठं विधान, कोण काय म्हणाले?

| Updated on: Jan 18, 2023 | 3:40 PM

सत्यजित तांबे यांना आता नेता होऊ वाटु लागले असुन त्यांची इच्छा जागृत करण्याचे काम भाजपातुन सुरु आहे. भाजपाकडुन थोराताच्या कुटूबांत राजकीय भेद निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

सत्यजित तांबे आणि धीरज देशमुख यांच्याविषयी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं मोठं विधान, कोण काय म्हणाले?
Image Credit source: Google
Follow us on

संदीप शिंदे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार असलेले सत्यजित तांबे आणि स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांच्याबद्दल कॉंग्रेसचे जेष्ठ माजी आमदार धनाजीराव साठे यांनी एक मोठं विधान केले आहे. खरंतर सत्यजित तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून कारवाई केली जाणार असल्याची परिस्थिती असतांना हे विधान केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सत्यजित तांबे आणि आमदार धिरज देशमुख यांच्या विषयी कॉंग्रेसचे ज्येष्ठ माजी आमदार धनाजीराव साठे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातांच्या घरात भेद निर्माण करण्याचे काम भाजपकडुन सुरु आहे. बाळासाहेब थोरातांना वडिलांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र थोरातांच्या नातेवाईकांना आता बाळासाहेब थोरातच का ? आपण पण नेता व्हावं असं वाटु लागल्याने त्यांच्या अपेक्षा वाढु लागल्या आहेत. त्यातुनच सत्यजित तांबेचा विषय आज समोर आलाय आहे असं स्पष्टच धनाजीराव साठे यांनी म्हंटले आहे.

सत्यजित तांबे यांना आता नेता होऊ वाटु लागले असुन त्यांची इच्छाजागृत करण्याचे काम भाजपातुन सुरु आहे. भाजपाकडुन थोराताच्या कुटूबांत राजकीय भेद निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

याच मुद्यावरुन विरोधकांकडुन देखील खत पाणी घालणं सुरु असुन यातुन तांबेच्या अपेक्षा वाढवण्याचे काम भाजपाकडुन सुरु असल्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

स्व. विलासराव देशमुख परिवारातील एकही जण भाजपात कधीच जाणार नाहीत, स्व. विलासराव देशमुख यांनी कॉंग्रेसला बळकटी आणण्याचे राज्यात काम केलं. पक्ष वाढवला आणि पक्षानं ही त्यांना दिल आहे.

देशमुख वाडा कुठेच हालणार नाही, आहे तिथेच राहणार हे मी खात्रीने सांगतो. भाजपात प्रवेश करायला मोठ्या नेत्यांनी नकार दिला की ईडीचा ससेमिरा मागे लागतो, हे आजचे वास्तव आहे असं साठे म्हणाले आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ माजी आमदार धनाजीराव साठे यांनी सत्यजित तांबे आणि धीरज देशमुख यांच्या विषयी बोलतांना भाजपवर निशाना साधला आहे.