Marathi News Maharashtra Dharashiv Maratha Sanghtana Rail Roko Maratha Reservation Latest News in Marathi
Maratha Reservation : धाराशिवमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रेलरोको
Dharashiv Maratha Sanghtana Rail Roko for Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको केला जात आहे. अशातच धाराशिवमध्ये मराठा संघटनेकडून रेलरोको करण्यात आला... यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आरक्षण आमच्या हक्काचं आहे. सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं हे आंदोलक म्हणत आहेत.
Follow us on
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा आता अधिक तीव्र होत चालला आहे. राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
धाराशिवमध्ये मराठा संघटनेकडून रेल्वेरोको करण्यात येत आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
मराठा आंदोलन रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे आंदोलन करू लागले. तेव्हा कडक पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आला. त्यामुळे स्टेशनला छावणी स्वरूप आलं आहे.
आरक्षण आमच्या हक्काचं आहे. सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं हे आंदोलक म्हणत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात आजपासून संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे आदेश दिले आहेत.