अमित शाह यांच्यावर बोलताना माजी आमदाराची जीभ घसरली; गंभीर आरोप काय?

| Updated on: Nov 23, 2023 | 3:01 PM

Anil Gote on Amit Shah : अमित शाह यांच्यावर माजी आमदाराचे गंभीर आरोप; बोलताना जीभ घसरली... ज्या भाषेत आरोप होणार त्याच भाषेत मी उत्तर देणार, असं म्हणत या माजी आमदाराने भाजपवर टीका केली आहे. त्यांनी अमित शाह यांच्यावर आरोप केलेत. हे आरोप करताना मात्र त्यांची जीभ घसरली.

अमित शाह यांच्यावर बोलताना माजी आमदाराची जीभ घसरली; गंभीर आरोप काय?
Follow us on

महेश, मसोळे, प्रतिनिधी, tv9 मराठी, धुळे | 23 नोव्हेंबर 2023 : भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सरसंधान साधण्यात आलं आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. गोधरा कांडात जीव वाचविण्यासाठी राम जेठमलानीचे पाय चाटत असल्याचा आरोप त्यांनी अमित शाह यांच्यावर केला आहे. तुरुंगात जाऊन आलो म्हणून माझी विश्वाहार्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करता मग अमित शाह देखील तुरुंगात जाऊन आले त्यांचं काय?, असा प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. ज्या भाषेत आरोप होणार त्याच भाषेत मी उत्तर देणार, असं म्हणत अनिल गोटे यांनी भाजपवर टीका केली आहे. हे आरोप करताना मात्र अनिल गोटे यांची जीभ घसरली आहे.

“अमित शाह फरार होते”

इशरत जहाँ प्रकरणात अमित शाह फरार होते. मी तसं काहीही केलं नाही. मी कारवाईला सामोरं गेलो. माझी केस मी स्वतः लढवली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे पाय चाटत होते, असं म्हणत अनिल गोटे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

फडणवीस, बावनकुळेंवर टीका

अनिल गोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. मी जे केलं ते स्पष्ट सांगतो आणि मान्य देखील करतो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी मी लपवालपवी करत नाही. भाजपचं देशप्रेम हे अतिशय ढोंगी आहे. भाजपाचे नेते लबाड आहेत. देवेंद्र फडणवीस हे झुटो के सरदार है!, अशा शब्दात अनिल गोटे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केलीय.

अनिल गोटे कोण आहेत?

अनिल गोटे हे धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009 ला ते धुळे विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले. काहीच दिवसांआधी अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे धुळे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. याच अनिल गोटे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. थेट अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.