धुळे : राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे जिल्ह्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचं वर्चस्व दिसून आलं. धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Election) चुरशीच्या होण्याऐवजी एकतर्फी झाल्याचं निकालावरून दिसतं. जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुका पार पडल्या. यात सर्वाधिक 49 ग्रामपंचायत या साक्री तालुक्यातील होत्या. या निवडणूक निकालांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. तालुक्यातील 15 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर त्या खालोखाल पश्चिम पटट्यात काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाने ग्रामपंचायती आपली झलक दाखवली. 52 पैकी तब्बल 20 ग्रामपंचायतींवर
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र निवडक ठिकाणीच यश मिळाल्याचे दिसून आलं. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोयीची भूमिका घेतल्याचं दिसतं. आपण माहिती घेतली नाही, अशीच भूमिका काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी घेतली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हे सध्यातरी भाजपाच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटालाही या निवडणुकांमध्ये यश मिळालंय. या दोन्ही पक्षांसाठी हे निकाल हुरूप वाढवणारे आहेत.
अजूनही काही ग्रामपंचायतीच्या 4 स्पष्टता नसल्याने कुठल्याही पक्षाने यावर धावा केल्या नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शिंदे गटाने 20 पेक्षा जागांवर दावा केला. अपक्ष निवडून आलेल्या आमदार मंजुळा गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला. साक्री तालुक्यात त्यांचा दबदबा राहिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळविता आला. कोरोना काळात ज्या निवडणुका झाल्या नाही. त्या आता घेण्यात आल्यात.
एकूण ग्रामपंचायती – 52
शिंदे गट – 20
भाजप – 15
काँग्रेस – 10
शिवसेना – 3
राष्ट्रवादी – 00