धनंजय मुंडे यांचा ‘या’ कंपनीला दणका, परवाना रद्द करत शेतकऱ्यांना दिला Helpline नंबर!

| Updated on: Jul 29, 2023 | 2:15 PM

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खते आणि बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई आणि यासंदर्भात एक नवीन कायदा आणणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

धनंजय मुंडे यांचा या कंपनीला दणका, परवाना रद्द करत शेतकऱ्यांना दिला Helpline नंबर!
Follow us on

अक्षय मंकणी, धुळे: बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यांना बोगस खते आणि बि-बियाणांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कित्येकवेळा दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे अधिक खर्च होतो आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचे पैसे वाया जातातच आणि त्याचा पिकाला फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होता. यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खते आणि बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई आणि यासंदर्भात एक नवीन कायदा आणणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

‘या’ कंपनीवर केली कारवाई?

धुळे जिल्ह्यमधील ग्रीनफिल्ड एग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या खत तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांसाठी बोगस बि-बियाणांसाठी एक नंबर दिला आहे. ज्यावर आपण कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो.

धनंजय मुंडे यांचं ट्विट:-

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. या कारवाईमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे.

 

हेल्पलाईन नंबर:-

बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती, असं धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी बोगस बियाणावरून निशाणा साधला आहे.