धुळे : स्टील गोडाऊनचे पत्रा उचकून तारांचे बंडल व बांधकामाचे साहित्य चोरणारा सराईत गुन्हेगार (Criminal) नियाज अहमद अजीज खान या चोरट्याला चाळीसगाव रोड (Chalisgaon Road Police) पोलिसांनी अटक केली आहे. नियाज अहमद अजीज खान उर्फ डिके (28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 48 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. 17 फेब्रुवारी रोजी शहरातील के.डी.ओ. कॉम्प्लेक्स 80 फुटी रोडवरील व्यापारी दीपेश वसंत अग्रवाल यांचे स्टीलच्या गोडाऊनचे मध्यरात्री पत्रा उचकवून दुकानातील 40 तारांचे बंडल व बांधकामांचे साहित्य असा एकूण 74 हजार 500 रुपये किमतीचा मु्देमाल व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार त्यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात केली होती. (Home burglar arrested with criminal charges in dhule, Action of Chalisgaon Road Police Administration)
दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीच्या हालचाली व शरीरयष्टीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यातील पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवत आरोपीला अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन चौधरी यांच्यासह शोध पथकातील कर्मचारी यांनी शहरातील मुल्ला कॉलनी भागातून या चोरट्याला अटक केली. पोलिस चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने त्याच्याजवळ असलेले चोरीचे 40 तारांचे बंडल असा एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर सराईत गुन्हेगार नियाज अहमद अजीज खान उर्फ डिके याच्यावर याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करीत आहेत.
अहमदनगरला कर्जत येथे स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दहा लाखांना दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकास अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय. सचिन पवार असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने संतोष घुडे यांना स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवत कर्जत रोडवर कोळंभी येथे बोलावलं. घुडे सोने घेण्यासाठी गेले त्यावेळी 10 ते 12 जणांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत, लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळचे 10 लाख रुपये लुटून पसार झाले. या घटनेची घुडे यांनी कर्जत पोलिसात तक्रार दिली होती. आरोपी सचिन पवार कुळधरण परिसरात येणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळल्यानंतर, सापळा रचून सचिन पवार याला ताब्यात घेतलं आहे. कर्जत पोलीस इतर आरोपींच्या शोधासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत. (Home burglar arrested with criminal charges in dhule, Action of Chalisgaon Road Police Administration)
इतर बातम्या
Beed : बीडमध्ये वाळू माफियांचा तहसिलदारांच्या घराला गराडा, दृश्ये सीसीटीव्हीत कैद