धुळे : महागाई खूप वाढली आहे. वाढत्या महागाईनं (Inflation) सगळ्यांचंच धाबं दणाणलं आहे. अशातच आता एक रुपयात काय होतं, असा प्रश्न कुणालाही पडेल. सध्याच्या घडीला एक रुपयांत लग्न होणं तर निव्वळ अशक्य! अशक्य गोष्टही शक्य धुळ्यात शक्य झाली आहे. एका रुपयांत बारा दाम्पत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. मोठ्या थाटामाटात 12 दाम्पत्य लग्नाच्या बेडीत अडकली आहेत. गेल्या 15 वर्षांपासून एका रुपयांत लग्न धुळ्यातील दोंडाईचामध्ये (Dondaicha, Dhule) फक्त एक रुपयांत सामूहिक विवाहसोहळा दिमाखात केला पार पडतोय. गरीब नवाज वेलफेअर संस्था दोडाईचा यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. थाटामाटात पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळ्याने आजवरच्या परंपरेला चारचाँद लावलेत. या वेळी 12 दाम्पत्य विवाहबंधनात (Marriage in 1 Rupee) अडकले. गरीब नवाज वेल्फेअर संस्थेतर्फे या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रत्येक जोडप्याकडून 100 लोक आले होते. त्यांच्या जेवण, नाश्त्याची सोयसुद्धा या सामूहिक विवाह सोहळ्यावेळी करण्यात आली होती. ख्वाजा गरीब नवाज यांच्या ऊर्सनिमित्त (यात्रेनिमित्त) हा सोहळा आयोजित केला होता. गरीब नवाज वेल्फेअरचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशिर पिंजारी यांच्यातर्फे प्रत्येक जोडप्याला गादी, पलंग, फ्रिज, कपाट, कूलर, गॅस कनेक्शन आणि 25 संसारोपयोगी भांडी देण्यात आली. आसिफ अलबेला यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.
15 दिवस आणि 1 महिन्याआधी लोकांना आवाहन केलं जातं. त्याप्रमाणे यंदाही आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, 1 रुपया घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या लग्नसोहळ्यासाठी कुणाकडून देणग्या घेतल्या जात नसल्याचं या वेल्फेअरचे अध्यक्ष पिंजारी यांनी म्हटलंय. वेल्फअरच्या माध्यमातून जो पैसा उभा राहतो, त्यातून या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. येणाऱ्या दिवसांत या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
Salman Khan | बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच
Breaking : सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार! अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी भर?