गुढीपाडव्यादिवशीच या शहरात मस्जिदीचा प्रश्न ऐरणीवर ; राज ठाकरे यांनी भर सभेत ही घटना सांगितली…

| Updated on: Mar 22, 2023 | 11:56 PM

सध्या या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाउंड मारण्यात आले आहे, त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूपदेखील लावण्यात आले आहे, तसेच आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत.

गुढीपाडव्यादिवशीच या शहरात मस्जिदीचा प्रश्न ऐरणीवर ; राज ठाकरे यांनी भर सभेत ही घटना सांगितली...
Follow us on

सांगली : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सांगलीच्या कुपवाडनजीक अनधिकृत मस्जिद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. एक महिन्यापूर्वी याठिकाणी मस्जिद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सांगलीच्या मंगलमूर्ती कॉलनीच्या मशीद बांधकामाचा वाद आता पेटल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहेत.

राज ठाकरे यांनी सांगलीच्या कुपवाड नजीक अनधिकृत मस्जिद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.त्यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा आता पुन्हा समोर आला आहे.

YouTube video player

एक महिन्या पूर्वी याठिकाणी मस्जिद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात या दोन्ही गटाकडून परस्पर तक्रार दाखल करण्यात आली होती. तर त्यानंतर पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.

सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी एका मस्जिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये मारामारीचा प्रकार घडला होता.

सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मस्जिदला विरोध केला होता. त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता.

सदरची मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत असून कोणतेही परवानगी नाही,आणि सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको,अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.

दरम्यान या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यानुसार 15 जणांच्यावर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

सध्या याठिकाणी शांततापूर्ण वातावरण असल्याचे संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

सध्या या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाउंड मारण्यात आले आहे, त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूपदेखील लावण्यात आले आहे, तसेच आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत.