डोंबिवली : डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील रुणवाल मायसिटी फेज-2 प्रकल्पाच्या (Dombivali Fire At Labour Colony) कामगार वस्तीला भीषण आग लागली आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर एक कामगार जखमी आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, आगीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग आणखीच भडकली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे (Dombivali Fire At Labour Colony).
आज सकाळी सात वाजताच्या सुमारास डोंबिबली मानपाडा रोड वरील रूनवाल मायसिटी प्रोजेक्तच्या फेज 2 च्या कामगार वसाहतीला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली.
या भीषण आगीत कामगारांच्या तब्बल 120 खोल्या जळून खाक झाल्या आहेत. या वस्तीत 172 कामगार राहत असल्याची माहिती आहे. आग लागल्याचं कळताच कामगारांनी पळ काढला. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहेतर एक कामगार जखमी झाला आहे.
राज्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ, धुळ्यात ट्रक पेटला आणि नालासोपाऱ्यात दुकानाला आग#dulefire #nalasaoparafirehttps://t.co/HliryF0c4X
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
Dombivali Fire At Labour Colony
संबंधित बातम्या :
Video : कोल्हापुरात गुरांच्या गोठ्याला भीषण आग, मुकी जनावरं होरपळली, लाखोंचं नुकसान