‘तो व्हिडीओ व्हायरल करू नका’; मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Nov 10, 2024 | 2:58 PM

मराठा समाज संभ्रमात आहे असं पसरवलं जात आहे, मात्र मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचं आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

तो व्हिडीओ व्हायरल करू नका; मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना नेमकं काय म्हटलं?
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, आता अवघ्या दहा दिवसांवर मतदानाची तारीख आली आहे. सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात  उडी घेतली होती, मात्र त्यानंतर आपण माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी मनोज जरांगे पाटील यांनी रणनीती स्पष्ट होताना दिसत आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

मराठा समाज संभ्रमात आहे असं पसरवलं जात आहे, मात्र मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचं आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत. समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, मी स्पष्ट सांगितलं आहे.  ज्यांनी अन्याय केला डोक्याच्या चिंधड्या केल्या त्यांना सोडायचं नाही. आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडीओ करून घ्या, जो आपल्या मागण्याशी सहमत राहील त्यांला निवडून आणा, पण तो व्हिडीओ व्हायरल करू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे बोलताना ते म्हणाले की गाव पातळीवर याबाब निर्णय घ्यावा, व्हिडीओ पण बनवा आणि लिहून पण घ्या. गावागावात व्हिडीओ बनवा, पण ते व्हायरल करू नका. आता मला विचारायचे काम नाही. मी काही पक्ष सांगितला नाही. तुम्हाला कोण पाहिजे, कोण मदतीला येतो, तुमच्या आरक्षणाबद्दल बोलतो ते बघा, आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष असा  कुणालाही पाठिंबा दिलेला नाही.

राजकारणाच्या तयारी पेक्षा आपण आता आंदोलनाची तयारी सुरू करू, कोणीही आले तरी आपल्याला आंदोलन करावेच लागणार आहे. मराठ्यांनी एकजुटीने मतदान करा. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. आपल्याला आरक्षण पाहिजे, आपण राजकारण करायचे नाही. पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. देवेंद्र फडणवीस देखील आपलं काही करू शकत नाही. आपण आरक्षणासाठी पुन्हा मोट बांधू. मराठ्यांनी एकजूट फुटू देऊ नका, असा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.