Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवलं, 9 जखमी

| Updated on: Dec 24, 2024 | 12:03 PM

उल्हासनगरमध्येही तशीच हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर शहरात मंगळवारी पहाटे मद्यधुंद कार चालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं. या अपघामतामध्ये 9 जण जखमी झाले आहेत.

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवलं, 9 जखमी
उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, 9 जखमी
Follow us on

पुण्यातील वाघोली चौकात रविवारी मध्यरात्री डंपरचालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं, त्यात तिघांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले. या घटनेने माजलेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उल्हासनगरमध्येही तशीच हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर शहरात मंगळवारी पहाटे मद्यधुंद कार चालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं. या अपघातामध्ये 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगर शहरातील व्हीनस चौक रस्त्यावर आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

उल्हानगरमधील कँप नंबर 4 येथील व्हीनस चौकात मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालकासह अनेक जण जखमी झाले आहेत. हा कारचालक व्हीनस चौकातून भरधाव वेगाने जात होता, तेव्हाच त्याच्या कारने रस्त्यावरील काही लोकांना तसेच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कारचालकही जखमी झाला असून त्याचावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

पुण्यात डंपरचालकाने 9 जणांना चिरडलं

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं. यामध्ये दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या वेळी डंपरचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे पुण्यात एकच खळबळ माजली.

पुण्यातील अपघाताला एक दिवसही उलटलेला नसताना आता उल्हासनगर शहरातही हिट अँड रनची अशीच घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून कारचालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.