कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंबाबाई मंदिर (Ambabai temple) आणि जोतिबांच्या (Jyotiba temple) दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी वेळ होती. ती आता 25 फेब्रुवारीपासून सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 अशी करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 3 या काळात ही दोन्ही मंदिरं पूर्णपणे बंद असतील. वेळेत बदल करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. (due to Corona Pandemic Ambabai and Jyotiba temple administration decided to change in timetable of temple visit)
राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर या देवस्थानातील दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या नियमांनुसार अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात भाविकांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. तर, दुपारी 12 ते 3 या वेळेत ही दोन्ही मंदिरं पूर्णपणे बंद असणार आहेत. हा निर्णय मंदिर देवस्थान समितीने घेतला आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. तसेच, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनाची वेळ बदलली असली तरी, दर्शनाला येताना भक्तांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच, सोशल डिस्टंन्सिगसह सॅनिटायझरचा वापरही देवस्थान समितीने बंधनकारक केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग असाच वाढला तर राज्यातील मंदिरं पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ येते की काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, केरळ आणि पंजाबमधील नागरिकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल असेल तरच दिल्लीत प्रवेश मिळेल. दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी या पाच राज्यांतील नागरिकांना RT-PCR अहवाल सादर करावा लागेल. 27 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून 15 मार्चपर्यंत तो लागू राहील.
फक्त 5 हजारांच्या गुंतवणुकीत लाखोंची कमाई करण्याची संधी; 9 मार्च शेवटची तारीख#MiraeAssetInvestmentManagers #MiraeAssetCorporateBondFundhttps://t.co/9RQ4ud2daN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
इतर बातम्या :