लातूर : एकाच रात्री दोन अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे चोरट्यांचे धाडस किती असू शकते याचा प्रत्यय आला आहे. (Latur District) लातूर शहरातील कन्हेरी चौकातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न होत असताना ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. परिसरातील नागरिकांनी लागलीच याची कल्पना पोलिसांना दिली. नागरिकांची सतर्कता आणि (Police) पोलीसांच्या तत्परतेमुळे वेल्डिंग मशीनच्या साहयाने कापलेले (ATM Theft) एटीएम मशीन जीपमध्ये टाकले जात असताना पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे चोरट्यांचा हा डाव तर फसला आणि चोरट्यांनी पळ काढला. मात्र एवढ्यावरच थांबतात ते चोरटे कसले? त्यांनी पळ काढत असताना वाटेतील चाकूर येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, मागावर पोलीस असल्याने त्यांचा हा प्रयत्नही फसला. पोलीसांच्या तत्परतेमुळे अखेर चोरट्यांना आपली जीप घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. रात्रभर सुरु असलेल्या चोर-पोलीसांच्या खेळात अखेर पोलीसांनी बाजी मारुन चोरट्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरवलेच शिवाय जीपही ताब्यात घेतली आहे.
लातूर शहरातील कन्हेरी चौकातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला होता. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होणार तेवढ्यात पोलीसांचे पाचारण झाले. परिसरातील नागरिकांनी वेळीच या घटनेची माहिती पोलीसांना दिल्याने ही घटना टळली. या कन्हेरी चौकातील एटीएम मशीनमध्ये तब्बल 16 लाख रुपये रक्कम होती.
लातूर आणि चाकूरातील घटनेच्या दरम्यान चोरट्यांनी एका जीपचा वापर केला होता. तपासा दरम्यान ही जीप हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. लातूरात चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी पुढे चाकूरमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस मागावर असल्याने त्यांना जीप सोडून पळ काढावा लागला. पोलिसांनी जीप ताब्यात घेतली असून ती हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
Latur : लातूरच्या ग्रामपंचायती ‘लयभारी’, शासनाच्या आवाहानाला ‘असा’ हा प्रतिसाद…!
Latur: दोन वर्षात 9 लाख 50 हजार जणांच्या कोरोना चाचण्या अन् 2 हजार 461 रुग्णांचा मृत्यू
Amravati Crime | पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ