लोकसभा निवडणुकीवेळी आय लव्ह यू, पण विधानसभेची वेळ आली की…गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान चर्चेत

| Updated on: May 09, 2024 | 11:17 AM

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है.

लोकसभा निवडणुकीवेळी आय लव्ह यू, पण विधानसभेची वेळ आली की...गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान चर्चेत
Follow us on

लोकसभा निवडणुकीचं रणमैदान सध्या चांगलचं पेटलं असून सगळीकडे राजकीय वातावरणही तापलं आहे. लोकसभा निवडणुकीतील 3 टप्प्यातील मतदान पार पडलं असून महाराष्ट्रातही २४ जागांवर मतदान झालं आहे. मात्र आता मुंबईसह नाशिक, पुणे या महत्वाच्या टप्प्यात येत्या काळात मतदान होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या शहरांकडे लक्ष वळवत जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रचारसभानांही वेग आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, आय हेट यू म्हणतात, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावरून आता चर्चा रंगली आहे.

आय लव्ह यू, आय हेट यू चा खेळ

जळगावच्या अंमळनेर येथील महायुतीच्या मेळाव्यात जाहीर भाषणात गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत सर्व एकमेकांच्या विरोधात असतात मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते..’ विधानसभेच्या निवडणुकीवेळी सर्वजण एकमेकांविरोधात उभे असतात. पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी, खासदारकीच्या वेळी शत्रूदेखील एकमेकांचे मित्र होता. आजच्या मंचावरच बघा… अंमळनेर मध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात आय लव यू.., तिकडे पाचोरा तालुक्यात किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात आय लव यू.., धरणगाव मध्ये गुलाबराव पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात आय लव यू. आणि विधानसभा निवडणूक लागली की, आय हेट यू ? असं गुलाबराव पाटील म्हणाले. एरवी आमची तोंडं वाकडी असली तरी देशाचं नेतृत्व ठरवण्यासाठी आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येऊन देशाचे नेतृत्व ठरवणार आहोत ही महत्त्वाची बाब आहे, असं ते म्हणाले.

तुम्ही जर आम्हाला टाळलं

आम्ही लोकसभेत मदत करतोय, तुम्ही विधानसभेत मदत करा, नाही केली तर लक्षात ठेवा..अस मंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर स्मिता वाघ यांना अप्रत्यक्षरीत्या सूचक इशारा दिला. तुम्ही जर आम्हाला टाळलं तर रेल्वे अमळनेरला पोहोचू देणार नाही, एवढी दादागिरी करू अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला.