सिद्धार्थ उद्यानात 16 वाघांसह 320 प्रकारचे प्राणी, कोरोनाकाळात अशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी, वाचा…

| Updated on: May 26, 2021 | 9:46 AM

सिद्धार्थ उद्यानात आज घडीला 16 वाघांसह 320 प्रकारचे प्राणी आहे. या प्राण्यांना कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जातेय. (During the Corona period animals care at Siddhartha Zoo Aurangabad)

सिद्धार्थ उद्यानात 16 वाघांसह 320 प्रकारचे प्राणी, कोरोनाकाळात अशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी, वाचा...
सिद्धार्थ उद्यान
Follow us on

औरंगाबाद : एकीकडे जगात माणसांना कोरोना होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पण औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात (Siddhartha Zoo Aurangabad) प्राण्यांनाही कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून काम केलं जात आहे. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांच्या जेवण्यापासून ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत अतिशय योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे.  (During the Corona period animals care at Siddhartha Zoo Aurangabad)

कोरोना काळात अशी घेतली जातेय काळजी

सिद्धार्थ उद्यानात आज घडीला 16 वाघांसह 320 प्रकारचे प्राणी आहे. या प्राण्यांना कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जातेय. सध्या सिद्धार्थ उद्यान हे बाहेरील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद आहे. जे लोक प्राण्यांची काळजी घेतात त्यांची सातत्याने मेडिकल चेकअप केलं जातंय. तर काही दिवसांच्या फरकाने त्यांच्याही कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.

पिंजऱ्याजवळ जाण्यापूर्वी केअर टेकरचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण

प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ जाण्यापूर्वी केअर टेकरला पूर्णपणे निर्जंतुक केलं जात आहे.

पाणी फिल्टर करुन बीफ गरम पाण्यात उकळवून

प्राण्यांना जे पाणी दिलं जात आहे ते पूर्णपणे फिल्टर करून दिलं जात आहे. तर जे बीफ खाण्यासाठी दिलं जातं ते बीफ गरम पाण्यात बुडवून निर्जंतुक करून मग प्राण्यांना दिलं जातं. ही सगळी काळजी घेतली जात असल्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राणी अजूनही कोरोना पासून दूर आहेत आणि कोरोना जोपर्यंत पूर्णपणे तोपर्यंत सिद्धार्थ उद्यान बंदच ठेवलं जाणार आहे.

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयाची थोडक्यात ओळख :

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे औरंगाबादमधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे.

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे “सिद्धार्थ” नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले आहे.

(During the Corona period animals care at Siddhartha Zoo Aurangabad)

हे ही वाचा :

सकाळी निर्णय, संध्याकाळी जीआर; कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अजितदादांची झटपट अ‍ॅक्शन

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती