हिंगोली | 21 मार्च 2024 : गुरूवारची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय खळबळजनक ठरली. हिंगोलीसह अनेक ठिकाणी गुरूवारी सकाळी-सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीमध्ये गुरूवारी सकाळी एकामागोमाग एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. १० मिनिटांच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरीक घाबरले. भूकंपाचा पहिला झटका 6 वाजून 8 मिनिटांनी जाणवला. 4.5 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती. तर भूकंपाचा दुसरा झटका दहा मिनिटांनी 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गुरूवारी सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंपाचे केंद्र हिंगोलीजवळ
हिंगोलीमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का 6 वाजून 8 मिनिटांनी तर भूकंपाचा दुसरा झटका 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली. सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा पडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.
कशी मोजली जाते तीव्रता ?
भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर मोजली जाते. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजे केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.
काय काळजी घ्याल ?
तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले, तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा, टेबलचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास तात्काळ घरातून, इमारतीमधून बाहेर पडा आणि मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा