नाशिकमध्ये आयशर, पिकअपचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

| Updated on: Jan 12, 2025 | 9:39 PM

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत.

नाशिकमध्ये आयशर, पिकअपचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी
Follow us on

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिक- मुंबई- अग्रा महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली.  या घटनेत मृत्यू झालेले सर्वजण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील सर्व मृत आणि जखमी हे कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर हा अपघात झाला आहे.  पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. पिकअपने आयशरला मागून धडक दिली. या अपघामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाली आहे.

वाहनांचा चुराडा 

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनांचा चुरडा झाला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, हळहळ व्यक्त होत आहे.