गिरीश भाऊचे प्रेमसंबंध…गेस्ट हाऊसवरची भानगड काय ? खडसेंनी उघड्या डोळ्यांनी काय पाहिलं ?

| Updated on: Nov 22, 2022 | 12:13 PM

संपूर्ण महाराष्ट्राला खडसे आणि महाजन यांचा वाद ठाऊक आहे. मात्र, याच काळात खडसे यांनी महाजन यांची गेस्ट हाऊसवरील भानगड मी पाहिली आहे ? असं म्हंटल्याने खळबळ उडाली आहे.

गिरीश भाऊचे प्रेमसंबंध...गेस्ट हाऊसवरची भानगड काय ? खडसेंनी उघड्या डोळ्यांनी काय पाहिलं ?
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

जळगाव : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवरून जळगावचं राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहेत. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा असता तर टो राजकारणात आला असता आणि सूनही राजकारणात आली असती असं म्हंटलं होतं. यावरून महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आत्महत्या की खून झाला याचा शोध घ्यावा लागेल असे म्हणत मला बोलायला लावू नका असे म्हंटलं होतं. यावरून खडसे कुटुंबाला वेदना झाल्याचे स्वतः खडसे यांनी सांगितले आहे. गिरीश महाजन यांनी केलेले विधानाने माझ्या कुटुंबाला खूप वेदना होत असून मला साठ-सत्तर फोन आले असेही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष जळगाव पुरता मर्यादित नाही.

संपूर्ण महाराष्ट्राला खडसे आणि महाजन यांचा वाद ठाऊक आहे. मात्र, याच काळात खडसे यांनी महाजन यांची गेस्ट हाऊसवरील भानगड मी पाहिली आहे ? असं म्हंटल्याने खळबळ उडाली आहे.

खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूवरुन आम्ही भावूक झाल्याचे देखील खडसे यांनी म्हंटले आहे. महाजन यांनाच मृत्यूचे कारण माहित असावे असं म्हणत खडसे यांनी मला यावर बोलायचे नाही म्हणत पडदा टाकला आहे.

हे सुद्धा वाचा

पण याच दरम्यान खडसे यांनी महाजन यांच्यावर एक गंभीर टीका केली आहे, त्याच टीकेचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून यायचे.

मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश भाऊ यांचे अनेक प्रेम संबंध आहेत. याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय खडसे म्हणाले, माझ्या चौकशी करून तुम्ही थकला आहात आता कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून मुलाच्या मृत्यूची चौकशी करा असा इशारा देखील खडसे यांनी दिला आहे.