अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठे नुकसान झाले आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट शेतकरी (Farmer) दोन्ही संकटाने अक्षरशः भरडला गेला आहे. त्यातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यातील परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्याची नाही असे विधान केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी सत्तार यांच्यावर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका, कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्र्यांकडून होत आहे, असं खडसे म्हणाले. एकूणच राज्यातील शेतकरी हा अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असतांना शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी होत असताना सत्तार यांच्याविधानावरून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असतांना त्यांना मदतीची गरज मात्र कृषीमंत्री मदत करायचे सोडून शेतकऱ्यांची टिंगल करत असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत सरकार करेल मात्र आता ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती नाही असे म्हंटले आहे.
कृषीमंत्री सत्तार यांच्या या विधानावरून शेतकारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे, शेतात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी तुंबलेले आहे, एकही पीक संपूर्णतः हाती लागत नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती यंदाच्या वर्षी बिकट झाली आहे, पावसाळ्यात दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती त्यात आता अतिवृष्टीने पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे.
एकूणच शेतकऱ्यांचा मुद्दा हेरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्तार यांच्यावर निशाण साधत मदत करायची नसेल तर करू नका पण टिंगल करू नका असे म्हंटले आहे.