मुंबई : शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार कसा करायचा असा प्रश्न महामंडळासमोर आहे. एसटी महामंडळाला (ST employees Salary) सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्यानं उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठुन असा प्रश्न महामंडळासमोर आहे. एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासुन 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केलेला नाही. एसटी महामंडळाचं उत्पन्न प्रती महिना 450 कोटी रूपये आहे. तर 650 कोटी रूपये प्रती महिना खर्च येतो. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी लागतात. तर डिझेलसाठी 250 कोटी रुपयांचा खर्च येतो. तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतात.