मुंबई : राहुल गांधी यांच्या यांचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यभर सरकार स्वातंत्र्यवीर सावकार यांची गौरव यात्रा काढणार आहे. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांची लायकी काढत जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मुख्यमंती एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकर यांच्या राहुल जाणीवपूर्वक अपमान करत आहे. परदेशात जाऊन राहुल गांधी भारताची निंदा करतात त्यामुळे तो एक देशद्रोह असल्याचं वाटत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हणत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिलं असून जहरी टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर आय्यर यांच्या थोबाडीत मारली होती ? तुम्ही राहुल गांधी यांच्या मारणार आहात का? असं आव्हान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी सतत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलून अवमान केला आहे. सावरकर यांच्यावर तुमची बोलण्याची लायकी सुद्धा नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले.
स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आहे. देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. राहूल गांधी यांच्यासाहित सर्वजण स्वातंत्र्याचा उपभोग घेत असल्याचे शिंदे म्हणाले.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या देशभक्तांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग आणि बलिदान दिलं आणि स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अवमान करण्याचे काम राहुल गांधी करत आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या सारखं एक दिवस जेलमध्ये राहून दाखवावे असं आव्हानही शिंदे यांनी केले आहे.
राहुल गांधी वारंवार सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. पण सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाहीये. सावरकरांचा त्याग तुमच्या मध्ये नाहीये, तुम्ही काय सावरकर होऊ शकता? सावरकर व्हायला तेवढा त्याग लागतो जो तुमच्यात नाही असेही शिंदे म्हणाले.
काही आमदार विधानसभेत मूग गिळून गप्प बसले होते. कॉंग्रेसच्या सोबत राहुल गांधी यांची खासदारकी वाचवायला आंदोलन करीत होते. ही वृत्ती महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष एक चीड आहे.
त्यामुळे संपूर्ण राज्यभर सावरकरांच्या त्याग आणि समर्पणाच्या निमित्त राज्यभरामध्ये जिल्हात, तालुक्यात आणि विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या निमित्ताने काढणार असल्याचे म्हंटले आहे.