“आमच्या ताटातील जेवून तो मोठा झाला अन्…” शिंदे गटातील नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Dec 02, 2024 | 8:19 AM

एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे शिंदे गटातील नेत्याच्या दाव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

आमच्या ताटातील जेवून तो मोठा झाला अन्... शिंदे गटातील नेत्याचा हल्लाबोल
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Follow us on

येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे. तर नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे शिंदे गटातील नेत्याच्या दाव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंला टोला लगावला होता. “एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते. पण त्यांना डॉक्टर की मांत्रिकाची जास्त गरज आहे. हा मांत्रिक अमित शाह की मोदी पाठवणार आहेत. यांच्या अंगातील जी भूत संचारली आहेत. ती आता उतरवायला हवीत आणि जर ते काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर चांगली गोष्ट आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. या टीकेला शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.

“एकनाथ शिंदेंबद्दल बोललेलं सहन केलं जाणार नाही”

“संजय राऊत यांच्या अंगातच भानुमती आली आहे. संजय राऊत म्हणजे सडलेल पिकलेलं डोकं आहे. त्यांची लायकी नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलणं योग्य नाही. आमच्या ताटातील जेवून तो एवढा मोठा झाला. राज्यसभेवर गेला. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं बोललेलं आता यापुढे सहन केले जाणार नाही”, असा सूचक इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

१० आमदार आमच्याकडे यायच्या तयारीत

“जळगाव जिल्ह्यात पाचपैकी एकही जागा हा माणूस निवडून आणू शकला नाही. त्यामुळे त्या बेअक्कल माणसाने जास्त बोलू नये. नाहीतर तुमच्याकडे जे २० आमदार आहेत, त्यातील १० आमदार आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत”, असा धक्कादायक दावा गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदारांची नावं सांगण्याचा आग्रह केला. त्यावर त्यांनी आगे आगे होता है क्या असा सूचक इशारा दिला.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली शपथविधीची तारीख

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री उशिरा एक ट्वीट केले होते. यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा कधी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारदि डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी  वाजता आझाद मैदानमुंबई येथे संपन्न होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.