मुंबई : सकाळपासून एकनाथ शिंद (eknath shinde) यांच्या बंडामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. दोन्हीकडून मध्यस्थी आणि वाटाघाटी या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार (Shivsena) असल्याच दावा भाजप नेते करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) ठाकरे यांनी शिवसैनिकांना जमण्याचं आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडबाबत आणि सरकार पडण्याबाबत विचारले असता आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सध्या तरी सावध भूमिका घेतली आहे. आत्ताच याबाबत काही बोलणं हे घाईचं ठरेल, त्यामुळे वेट अँड वॉच असे म्हणताना एकनाथ शिंदे दिसून आले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या ट्विटबाबत विचारले असता समजनेवाले को इशारा काफी है, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता भाजपची पुढची चाल काय असणार? असाही सस्पेन्स तयार झाला आहे.
अचानकच काल संध्याकाळी हा मेसेज आला की काही जण नॉट रिचेबल आहेत. त्यातून हा विषय पुढे चालला आहे. हे अडीच वर्षांपूर्वीच अनैसर्गिक सरकार स्थापन झालं. तेव्हाच अनेक आमदारांचा विरोध होता. मला हिंदूत्व सोडायचं नाही, भाजपला हा धडा शिकायचा आहे. म्हणून हे सत्तेत गेले. तेव्हा लोक रोज विचारत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या देणारे, अशांपासून बाहेर पडण्याची लोक वाट बघत होते. तेव्हा वेळकाढूपण करणे हे या नेतृत्वाची चूक आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. एकानाथ शिंदे यांचं जे बंड आहे. यात भारताची कोणतीही पूर्वनियोजित योजना नाही, यातून पुढे काय होईल ते आत्ताच सांगता येत नाही, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे.
याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, वादळ आलं आहे तर ते जाईल पण. तसेच अडीच अडीच वर्ष अस काही ठरलं नाही. तर काँग्रेस – राष्ट्रवादीचे आमदार रिचेबल आहेत, जे नाहीत ते रिचेबल होतील. एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. म्हणून गटनेतेपदी दुसरं कोणीतरी असेल, कारण आमदारांनाही सांभाळावं लागेल, असेही भुजबळ म्हणाले आहेत. तर हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र थोडासा वेळ लागेल पण हे वादळ शमल्याशिवाय राहणार नाही, तसेच सरकारला धोका नाही, असेही भुजबळांनी सांगितले आहे. मात्र आत्ताची परिस्थिती पाहता हे किती खरं ठरतं हे पुढे काही तास सांगतील असा अंदाज राजकीय पंडीत सध्या वर्तवत आहे.