मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) दोन दिवसांनंतर संयम थोडा बाजुला ठेवत आज तेट शिंदे गटाला आव्हान दिलंय. त्यांनी कुणाला काय दिलं, ते ठाकरेंच्या नावावाचून तुमचं काय होईल, हेही सांगून टाकलं. त्याच वेळी नेमकं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गुवाटातील हॉटेलातून बाहेर पडले आणि राजकारणात चर्चा आणि तर्कवितर्कांना चांगलाच उत आला. एकनाथ शिंदे नेमके गेले कुठे हाच सवाल संपूर्ण देशाला पडला? मग याची उत्तर शोधताना अनेक अंदाज बांधले जाऊ लागले. एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि पुन्हा हॉटेलात आले. यात तीन तासांचं अंतर होतं. या तीन तासात नेमकं काय घडलं? याचं उत्तर प्रत्येकाला हवं होतं. सुरूवातील कोण म्हणायचं शिंदे हे मुंबईला गेले. तर कोण म्हणायचं शिंदे हे कामाक्षी देवीच्या (Vist Kamakhya mandir) दर्शनाला गेले.
हॉटेलातून निघालेले एकनाथ शिंदे आता गुवाहाटीहून मुंबईला रवाना झाले आहेत, असा कयास आधी लावला जाऊ लागला. यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन संजय राऊत म्हणाले होते की शिंदेंना मुंबईत यावच लागेल. त्यामुळे शिंदे उपसभापतींना भेटण्यासाठी मुंबईत येत असल्याची चर्चा काही काळ रंगली. इथे शिवसेनेच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे शिंदे सांगू शकतील, असेही अदाज लावले जाऊ लागले. मात्र हे खरं नव्हतं.
तर काही वेळातच एकनाथ शिंदे हे आसाममधील कामाक्षी देवीच्या दर्शनाला गेले आहेत. अशी माहिती समोर आली. मात्र सर्व ताफा सोबत असताना शिंदेंना दर्शनाला तीन तास कसे लागले? की शिंदे दर्शनाला सांगून कुणा दुसऱ्या नेत्याच्या भेटीला गेले होते का? असाही सवाल विचरला जाऊ लागला. मात्र हे मंदिर हॉटेलपासून दूर आणि डोंगरावर असल्याने शिंदेंना तीन तासांचा वेळ लागल्याचेही सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे हे अनेकदा कपाळावर टिळा लावताना दिसून येतात. त्यांना देवावर श्रद्धा असणारे नेते म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते देवीच्या दर्शनाला गेले आहे. आपल्याकडे जसे सिद्धीविनायक आणि इतर देवांच्या चर्णी नेते गेल्यावर त्यांची मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते. अशीच शिंदेंचीही अस्था आहे. असे सांगण्यात आले. तसेच या कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे आणि योगायोगाने शिंदेही जवळपास थांबल्याने दर्शनाला पोहोचले. मात्र देवदर्शनाच्या या तीस तासातही राज्यातलं राजकारण हे गॅसवरच होतं.