एकनाथ शिंदेंची संघटना बांधणी, ठाकरेंचे दोन शिवसैनिक शिंदेंच्या गळाला…

| Updated on: Sep 19, 2022 | 5:04 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे खासदार गोडसे यांच्या उपस्थित अनिल ढिकले नाशिक जिल्हाप्रमुख तर भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुख अशा दोन नियुक्त्या देत उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदेंची संघटना बांधणी, ठाकरेंचे दोन शिवसैनिक शिंदेंच्या गळाला...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे मुंबईनंतर राजकारणी नेहमीच नाशिकमध्ये (Nashik) आपली सत्ता असावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्यात ठाकरेंनी पहिल्यापासूनच नाशिकमध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र आता शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री पदी  विराजमान झाल्यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर दौरे आखत संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई आणि ठाणे नंतर शिंदे यांनी नाशिकमध्ये संघटना बांधणीस सुरुवात केली आहे. कधीकाळी उद्धव ठाकरेंचे शिलेदार असलेले अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांना जिल्हाप्रमुखांची नियुक्ती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे खासदार गोडसे यांच्या उपस्थित अनिल ढिकले नाशिक जिल्हाप्रमुख तर भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुख अशा दोन नियुक्त्या देत उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे.

अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांना नियुक्तीपत्र देतांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे देखील उपस्थित होते.

अनिल ढिकले यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून दिंडोरी मतदार संघाची जबाबदारी भाऊलाल तांबडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

हेमंत गोडसे यांना यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रत्येक गावात आपली शाखा सुरू झाली पाहिजे आपले कार्य पोहचवण्याचे काम करा असे सांगितले.

नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदेंच्या गटात सहभागी होऊन संघटना बांधणीचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातून शिंदे यांच्या पाठीमागे खासदार हेमंत गोडसे सोडले तर फार मोठे नेते किंवा नगरसेवक सहभागी झालेले नाहीत.

ग्रामीण भागातून सेनेचे आमदार असलेले दादा भुसे, सुहास कांदे शिंदे यांच्या सोबत आहे. त्यामुळे शिंदेंना नाशिकमध्ये संघटना वाढविण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसैनिकांबरोबर पदाधिकारी, माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात ते दिसून आले आहे.