मुंबई : पहिल्यांदा शासकीच कर्मचाऱ्यावर हात उगारला, नंतर शिवीगाळ केली आणि आता थेट प्राचार्यांनी महिला प्राध्यापकांना त्रास दिला म्हणून त्यांना मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आला आहे. संतोष बांगर यांच्याकडून वारंवार हे असले प्रकार होत असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा वचक राहिला नाही का असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही या गोष्टींचे सर्मर्थन करत नाही मात्र दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांवर संतोष बांगर यांच्याकडून होणारे हल्ले थांबायचे नावही घेतले जात नाही.
या मारहाण आणि दमदाटी सुरुच असल्याबद्दल संतोष बांगर यांना विचारला असता महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर झालेल्या टीका आणि मला त्यांची पर्वा नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे.
तर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर मात्र पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळा, शिस्त पाळा अशा सूचना केल्या आहेत. तरीही संतोष बांगर यांच्याकडून हे प्रकार सुरुच असल्याने याबाबत आता शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे विरोधकांकडून या प्रकरणावरून संतोष बांगर आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. हातात कायदा घेऊन मारहाण करणे चुकीचे असल्याचे सांगितले जात आहे.
विषय काही असला तरी एका शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याला अशा स्वरूपाची मारहाण करणे चुकीचे आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या या संतोष बांगर आमदारामुळे मात्र शिंदे गट अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा पाळा, संयम पाळा अशा सूचना देऊनही संतोष बांगर मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.