वारकरी पायी निघाले पंढरपूरकडे; पालखी सोहळा रद्द तरीही वारकर्‍यांनी धरला पंढरीचा रस्ता

| Updated on: Jul 08, 2021 | 1:54 AM

वारी जरी झाली नसली तरी पालख्यांचे प्रस्थान झाले असल्याने अनेक वारकऱ्यांनी आपापल्या सोयीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

वारकरी पायी निघाले पंढरपूरकडे; पालखी सोहळा रद्द तरीही वारकर्‍यांनी धरला पंढरीचा रस्ता
आषाढी वारी, फाईल फोटो
Follow us on

बारामतीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीदेखील पालखी सोहळा आणि पायी वारी रद्द करण्यात आली. वारी जरी झाली नसली तरी पालख्यांचे प्रस्थान झाले असल्याने अनेक वारकऱ्यांनी आपापल्या सोयीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. वारकरी चालत आपली पायी वारी पंढरपूरपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. (Even after the cancellation of the palakhi ceremony, the Warkaris took the Pandhari road)

आषाढी पंढरपूरची पायी वारी म्हणजे वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वारी

आषाढी पंढरपूरची पायी वारी म्हणजे वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वारी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती वारी गेल्या दोन वर्षांपासून सरकारने रद्द केली. त्यामुळे काही निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुका पंढरपूरकडे एसटीने नेल्या जातात. यावर्षी देखील पालख्यांचे प्रस्थान झाले असले तरी पादुका ह्या एसटीने पंढरपूरकडे जाणार आहेत. पायीवारी रद्द झाली असली तरी अनेक वारकऱ्यांनी पायी चालत पंढरपूरचा रस्ता धरला. त्यामध्ये अनेक वारकऱ्यांना पोलिसांनी समजावून तिथेच त्यांची वारी बंद करून त्यांना घरी जाण्यास सांगून पोलीस देखील आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

वारकऱ्यांकडून भावनांना वाट मोकळी

यावेळी वारकऱ्यांनीही आपल्या भावना बोलून दाखवल्यात. आम्ही परंपरेनुसार वारी करतो. मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे वारी रद्द झाल्याने आम्ही शासनाचे ऐकले. यावर्षी आम्ही पंढरपूरकडे चालत जाणारच आहोत. यावर्षी सर्व काहीच सरकारने सुरू ठेवले असून फक्त मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. आम्ही आता पायी वारी सुरू केली. पायी चालत असताना सरकारच्या नियमांचे पालन करीत आहोत. आमची पायी वारी सुरू आहे, जिथपर्यंत आम्हाला जाऊ दिले जाईल, तिथपर्यंत आम्ही पायी चालत जाणार आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला अडवले जाईल त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी आमची वारी पूर्ण झाली असे समजू, असंही ते म्हणालेत.

…म्हणून वारीमधले वारकरी सरकारला चालत नसावेत

आम्ही दरवर्षी आषाढी कार्तिकी पायी वारी करतो. देवाची दार बंद आहेत, मात्र दारूची दुकाने चालू आहेत हा सरकारचा न्याय आहे. सरकारने लग्नसोहळ्यासाठी 50 लोकांची परवानगी दिली असताना आमदाराच्या पोरांच्या लग्नात सरकारला 5 हजार लोकांची झालेली गर्दी चालते. या गर्दीत नेतेही हजेरी लावतात, मात्र वारीमध्ये वारकरी चालत नाहीत, असा सवाल देखील संतप्त वारकर्‍यांनी केला. दारू खरेदीसाठी पाचशे लोकांची लाईन देखील सरकारला चालते ही महाराष्ट्रामधल्या अवस्था आहे, असंही वारकरी म्हणालेत. एकूणच सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा रद्द झालाय.. त्यामुळं वारकऱ्यांनी आता स्वत:च पायी निघत वारीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केलाय.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

Even after the cancellation of the palakhi ceremony, the Warkaris took the Pandhari road