आठवड्यापुर्वी आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात प्रदूषणाबाबत बैठक, पंचगंगा नदी पात्रात पुन्हा मृत माशांचा खच; प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

| Updated on: Feb 27, 2022 | 8:04 AM

पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी पर्यावरण विभागापुढे मोठं आवाहन असेल. तिथल्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असल्याने लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे.

आठवड्यापुर्वी आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात प्रदूषणाबाबत बैठक, पंचगंगा नदी पात्रात पुन्हा मृत माशांचा खच; प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पंचगंगा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच
Image Credit source: tv9
Follow us on

कोल्हापूर – पंचंगगा (panchganga) नदीत अनेक केमिकल असलेल्या गोष्टी सोडत असल्याने नदीच्या पात्रातील पाणी नेहमी प्रदुषित असल्याचं पाहायला मिळतं. पंरतु तिथं सध्या नदीच्या पात्रात अनेक मासे मेले असल्याचे दिसत आहे. हे मासे कशाने मेले आहेत, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मागच्या आठवड्यात आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी कोल्हापूर (kolhapur) दौ-याच्यावेळी पंचगांगा नदीच्या प्रदुषणाबाबत एक बैठक अधिका-यांची बैठक घेतली होती. त्यांच्या दौ-याला आठदिवस झाल्यानंतर अशी घटना घडल्याने कोल्हापूरात बैठक फक्त नावालाच घेतली असल्याची चर्चा आहे. नदीच्या पात्रात माशांचा खच असल्याने तिथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पंचगंगा नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतं असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल अशी कोल्हापूरकरांच्यामध्ये देखील चर्चा आहे.


परिसरात दुर्गंधी

कोल्हापुरातील वळीवडे, सुर्वे बंधारा परिसरात माशांचा खच पाहायला मिळत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नेमका कशामुळे माशांचा मृत्यू झाला असेल याची चर्चा कोल्हापूरवासीयांमध्ये आहे. कारण आत्तापर्यंत नदीच्या पात्रात माशांचा अनेकदा मृत्यू झाला आहे. पंचगंगा नदीच्या पात्रात कपडे, जनावर धुणे, कारखान्यांचं केमिकल सोडणे अशामुळे नदी पाणी अधिक प्रदुषित झाल्याचं आत्तापर्यंत पाहिलं आहे. परंतु इतक्या माशांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे. नदीत खच पडलेल्या माशांना कसं नष्ठ करायचं असा प्रश्न आता पर्यावरण खात्याला पडला असेल. माशांची तपासणी केल्यानंतर नेमका माशांचा मृत्यू कशामुळे झाला हे सुध्दा स्पष्ट होईल.

नागरिकांचं आरोग्य धोक्यात

पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी पर्यावरण विभागापुढे मोठं आवाहन असेल. तिथल्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असल्याने लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. आठवड्याभरापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणाबाबत घेतली होती बैठक, त्यानंतर असा प्रकार घडल्याने अनेकांनी पर्यावरण विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. आदित्य ठाकरेंनी तिथल्या अधिका-यांना प्रदुषणाबाबत अनेक सुचना देखील केल्या होत्या. मेलेल्या माशांना नष्ठ करून पाणी कसं स्वच्छ करता येईल यावर पर्यावरण विभागाला मोठी कसरत करावी लागेल असं चित्र कोल्हापुरात आहे.

दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू, कारवाईत काय हाती लागलं हे मात्र गुलदस्त्यात

विरार गोळीबार प्रकरणी शिवसेनेच्या चौधरींसह 8 जणांवर गुन्हा दाखल; बदला घेण्यासाठी फायरिंग केल्याचं उघड

डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट