मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या याच शक्यतेमुळे परराज्यातील कामगार, कर्माचारी यांच्यामध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सध्या मध्ये रेल्वे विभागाकडून ‘स्पेशल श्रमिक रेल्वे’ (special shramik railway) सुरु करण्यात आल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. याच अफवेला अनुसरुन रेल्वे विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. (fact check fals information been spread regarding special shramik railway central railway said there is no any shramik railway been run)
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागू केल्यानंतर परप्रांतीय कर्मचारी तसेच कामगारांची मोठी परेशानी झाली होती. दळणवळणाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक कामगारांनी हजारो मैल पायी प्रवास केला होता. आपल्या कुटुंबासह हजारो किलोमिटर पायी चालत जाणारे फोटो अत्यंत हृदयद्रावक होते. सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच कारणामुळे अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निर्बंध लागू करुनसुद्धा कोरोनाला थोपवता येत नल्यामुळे आता पुन्हा एकदा पूर्ण लॉकडाऊन करण्यावर विचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेकडून ‘श्रमिक विशेष गाड्या’ चालवल्या जात आहेत, असा मेसेज सोशल मीडियावर फिरतो आहे.
चुकीच्या माहितीबद्दल तथ्य
रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियामध्ये श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात असल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे.
येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ‘अशा कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या’ चालविल्या जात नाहीत / नियोजन नाही. 1/3
— Central Railway (@Central_Railway) April 10, 2021
हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील श्रमिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ उडू नये म्हणून “सोशल मीडियामध्ये श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात असल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. अशा कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या’ चालविल्या जात नाहीयेत किंवा तसे नियोजनसुद्धा नाहीये,” असे मध्य रेल्वे विभागाने म्हटले आहे.
तसेच यावेळी मध्ये रेल्वेने सध्या फक्त उन्हाळी आणि नियमित विशेष गाड्या चावलण्यात येत असल्याचेसुद्धा सांगितले. “रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. केवळ कन्फर्म तिकीट धारकांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे,” असे रेल्वे विभागाने सांगितले आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?
(fact check fals information been spread regarding special shramik railway central railway said there is no any shramik railway been run)