हत्ती आणि मुंग्यांनो परत या, भारतात भला विनोद करायचा तरी कसा?, कामरा आणि शिंदे वादावर हा कॉमेडियन व्यक्त झाला

| Updated on: Mar 24, 2025 | 7:51 PM

कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. कुणाल कामरा याने एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विडंबनात्मक टीप्पणी केली आणि राजकारण पेटले आहे.

हत्ती आणि मुंग्यांनो परत या, भारतात भला विनोद करायचा तरी कसा?, कामरा आणि शिंदे वादावर हा कॉमेडियन व्यक्त झाला
Follow us on

कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात राजकीय शेरेबाजी आणि विडंबनात्मक गाणे केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उप मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टीका केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अंधेरीतील युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलातील कुणाल कामरा याचा सेट तोडून टाकला आहे. त्यानंतर कुणाल कामरा याच्या विरोधात गु्न्हा दाखल झाला असून तो फरार असल्याचे म्हटले जात आहे. सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकावर देखील गु्न्हा दाखल केला आहे. त्यानंतर पालिकेने या युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडले आहे. आता या प्रकरणात कॉमेडियन कुणाल कामरा याने आपले दु:ख व्यक्त केले आहे.

कॉमेडियन कुलाम कामरा याचा शो प्रसिद्ध आहे. या स्टँडअप कॉमेडियनने या शोमध्ये थेट राजकीय शेरेबाजी केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट पॅरिडी साँग गायले आहे. त्यानंतर या शोचा ट्रेलर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट केल्याने आगीत तेल पडले. आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नीलम म्हात्रे यांनी आमच्या नेत्याची माफी मागितली नाही तर आम्ही सोडणार नाही अशी भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. त्यानंतर अंधेरीतील युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलमधील कुणाल कामरा याच्या शोचा सेट शिवसैनिकांनी तोडून टाकला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे दुसरे एक नेते संजय निरुपम यांनी सकाळी अकरा वाजता कुणाल कामरा याला चोपणार असे सांगितले. मात्र, कुणाल कामरा फरार झाल्याचे उघडकीस आले.

हे सुद्धा वाचा

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात अनेक लोकांनी भूमिका मांडली असताना आता त्याला पाठींबा देणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. कुणाल कामरा याने गद्दाराला गद्दार म्हटले आहे, यात काय चुकीचे आहे अशी भूमिका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. तर कुणाल कामरा याच्या बाजूने आता कॉमेडियन अभिजीत गांगुली देखील पुढे आले आहेत. भारतात आता विनोद कसा करायचा असा सवाल त्यांनी केला आहे.

पोस्ट येथे वाचा –

जोक्स कोणावर करायचा ?

कॉमेडियन अभिजीत गांगुली यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर लिहीलेय की, ‘भारतात माणसाने जोक्स करायचे तर कसा ? पॉलिटिशियनवर केला तर समर्थक वेन्यू तोडून टाकतात. क्रिकेटर वा एक्टरवर केला तर त्यांचे चाहते दोन महिने सोशल मीडियावर शिव्या देतात.

जोक्समध्ये हत्ती आणि मुंग्यांना परत यावे लागेल

क्राऊडवर्क केला तर इंटेलेक्च्युअल म्हणतात की रिअल कॉमेडी नाही. आपल्या पत्नीवर विनोद केला तर लोक सेक्सिस्ट म्हणतात. आपल्या आई-वडीलांवर जोक्स केला तर संस्कारहीन म्हणतात. मग हत्ती आणि मुंग्यांनी परत यावे अशा शब्दात कॉमेडियन अभिजीत गांगुली यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे. अभिजीत गांगुली यांनी स्टँडअप कॉमेडियन आहेत. यूट्यूबसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आणि विशेष स्टँड-अप प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहेत.