प्रतिबंधित बीटी वांग्याची लागवड करून शेतकरी संघटनेचा सत्याग्रह; जीएम वाणांना परवानगी देण्याची मागणी

| Updated on: Feb 19, 2022 | 3:24 PM

जगभर जनुक सुधारित पिकांना, जेनिटिकली मॉडिफाईड (जी. एम.) वाणांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, भारतात फक्त कपाशीच्या बोलगार्ड 1 व बोलगार्ड 2 या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक जातींना मान्यता नाही.

प्रतिबंधित बीटी वांग्याची लागवड करून शेतकरी संघटनेचा सत्याग्रह; जीएम वाणांना परवानगी देण्याची मागणी
श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बीटी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले.
Follow us on

नाशिकः सरकारने जीएम पिकांना परवानगी द्यावी, अशी मागणी करत शेतकरी (Farmer) संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने श्रीगोंदा फॅक्टरी येथे प्रतिबंधित बीटी (Bt) वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंग करत किसान सत्याग्रह करण्यात आला, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. घनवट म्हणाले की, जगभर जनुक सुधारित पिकांना, जेनिटिकली मॉडिफाईड (जी. एम.) वाणांना मान्यता (permission) देण्यात आली आहे. मात्र, भारतात फक्त कपाशीच्या बोलगार्ड 1 व बोलगार्ड 2 या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक जातींना मान्यता नाही. इतर पिकांमध्ये ही उत्पादन वाढवणार्‍या, पाण्याचा ताण सहन करणार्‍या, खारवट जमिनीत येणार्‍या व अधिक सकस अन्न देणार्‍या जाती तयार आहेत. त्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकविल्या जातात व तेथील शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत, असा दावा त्यांनी केला.

नेमके प्रकरण काय?

बीटी वांग्याचे बियाणे भारतातील कंपनीने, एका कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने तयार केले आहे. मात्र, भारतात या बियाण्याला बंदी आहे, पण बांग्लादेशाने सात वर्षांपूर्वी मान्यता दिली व तेथील शेतकरी फायदा कमवत आहे. ही बंदी मोडून काढणयासाठी हा सविनय कायदेभंग आहे. या पूर्वी अकोला जिल्हयात तणनाशक रोधक कपाशीची लागवड करून किसान सत्याग्रह केला होता. श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बीटी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकर्‍यांनी आंदोलनात भाग घेतला.

दिल्लीला देणार धडक

आंदोलनाला आलेल्या शेतकरी सीमा नरोडे यांनी जीएम पिकांमुळे महिलांचे श्रम कमी होतात व आरोग्य चांगले राहते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी जीएम ही उद्याची शेती आहे व हा लढा स्वातंत्र्याचा आहे, असा उल्लेख केला. तर स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी हा लढा दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकर्‍यांनी दिल्लीला धडक द्यायची गरज व्यक्त केली. बीटी वांग्याबरोबर सर्व जीएम पिके घेण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍यांना मिळाल्यास शेतकर्‍यांचा फायदा होईल. ग्राहकांना रास्त दरात अन्न मिळेल व देश समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी रामजिवन बोंदर, सतीश दाणी, सुधीर बिंदू, मधूसूदन हरणे, विजय निवल यांनी मार्गदर्शन केले. किसान सत्याग्रहामध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!