नाशिक : नाशिक शहरात बस आणि टँकरच्या अपघातात (Accident) 12 जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील (Nashik) अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच 12 जणांचा मृत्यू आणि 31 जण जखमी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये धाव घेत अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. त्यातच नाशिक शहरातील सर्व अपघाती क्षेत्र म्हणजेच ब्लॅक स्पॉट निश्चित करण्याचे आदेश शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांच्या सुचनांचे तातडीने पालन करत शहरातील 15 ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहे., वारंवार होणाऱ्या अपघातस्थळांचा शोध घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, शहर पोलीस आयुक्तालय आणि नाशिक मनपामधील अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीची बैठक घेत ही ब्लॅक स्पॉट निश्चित केले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नाशिक शहरातील औरंगाबाद रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या अपघाताबाबत दखल घेत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुख्यमंत्री यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन, पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेत सूचना दिल्या होत्या.
अवघ्या काही तासातच हे ब्लॅकस्पॉट शोधून त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत आढावा घेतला असून जिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांची आणि मृतांबाबत अधिकची चौकशी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते त्यावेळी ही माहिती दिली आहे.
नाशिक शहरातील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून अंमलबजावणी 10 ते 15 केली जाईल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
याशिवाय पाच मृतांची ओळख पटली असून इतरांचे डीएनएच्या माध्यमातून शोध घेतला जाणार असल्याची माहिती भुसे यानं दिली आहे.