चित्रपट निर्माते माजी खासदार प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. तसेच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा कुशन नंदी यांनी दुजोरा दिला असून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे राहत्या निवास स्थानी निधन झाले असून चित्रपटसृष्टीसह विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अनुपम खेर यांची पोस्ट –
Deeply deeply saddened and shocked to know about the demise of one of my dearest and closest friends #PritishNandy! Amazing poet, writer, filmmaker and a brave and unique editor/journalist! He was my support system and a great source of strength in my initial days in Mumbai. We… pic.twitter.com/QYshTlFNd2
— Anupam Kher (@AnupamPKher) January 8, 2025
चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी लेखक पत्रकार अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रितीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून अभिनेते अनुपम खेर यांनी दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकीत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रितिश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतिव दुःख होत आहे आणि हे वृत्त ऐकूण आपल्याला धक्का बसला आहे. एक अद्भूत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार आपण गमावला आहे. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात माझे प्रेरणा एक मोठा स्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत.
प्रितीश नंदी यांचा जन्म १५ जानेवारी १९५१ रोजी पूर्व भारतातील बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांनी कवी ,चित्रकार, पत्रकार, संसदपटू, मीडिया आणि दूरदर्शन आदीत त्यांनी मोठे काम केले होते. ते महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून आले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि १९८० च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या बॅनरखाली सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वैशीं ऐसी, प्यार के साईड इफेक्ट्स यांसारख्या चित्रपटांसह ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या कंपनीने अलीकडेच फोर मोअर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मिती केली.
प्रितिश नंदी हे पत्रकार आणि मानवतावादी होते.त्यांनी १९९० च्या दशकात दूरदर्शनवरील ‘प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो देखील होस्ट केला होता. त्यात ते सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असत.