नवी दिल्ली : स्टेजवर एखादी मान्यवर व्यक्ती बोलत असेल. मध्येच त्यांनी आयोजकांना पाणी देण्याची विनंती केली. कुणीतरी कर्मचारी येऊन आपल्याला पाणी देईल, अशा अपेक्षेत असलेल्या या व्यक्तीला जेव्हा थेट देशाच्या अर्थमंत्री हातात पाणी आणून देतात, तेव्हा त्या व्यक्तीला किती ओशाळल्यासारखं वाटलं असेल. नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)च्या व्यवस्थापकीय संचालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टेजवर पाणी दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हारल होत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यानची ही घटना आहे. NSDL च्या व्यवस्थापकीय संचालक पद्मचा चुंडुरू भाषण देत होत्या. यावेळी घशाला कोरड पडल्यामुळे त्यांनी स्टाफला पाणी मागितलं. पण काही वेळात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्वतः त्यांना पाणी आणून दिलं. यामुळे पद्मजा चुंडुरू यांना ओशाळल्यागत झालं. देशाच्या अर्थमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून नेटकऱ्यांमध्ये कौतुकास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.
शनिवारी NSDL चा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्हिडिओत NSDL च्या व्यवस्थापकीय संचालक भाषण करत होत्या. एवढ्यात घसा कोरडा पडला म्हणून त्यांनी आयोजक स्टाफला पाणी मागितलं. काही वेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्वतः त्यांच्या बाजूला येऊन पाणी देताना दिसतात. अर्थमंत्री त्यांना ग्लास आणि पाण्याची बाटली देतात. अर्थमंत्र्यांनीच पाणी आणणलेलं पाहून NSDL च्या एमडींना ओशाळल्यासारखं होतं. त्या अर्थमंत्र्यांचे आभार मानतात. यावेळी उपस्थितांमधूनही जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो. अर्थमंत्र्यांच्या या साधेपणाबद्दल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही कौतुक केले आहे.
This graceful gesture by FM Smt. @nsitharaman ji reflects her large heartedness, humility and core values.
A heart warming video on the internet today. pic.twitter.com/isyfx98Ve8
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) May 8, 2022
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. निर्मला सीतारमण यांनी शनिवारी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी NSDL च्या गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम ‘मार्केट का एकलव्य’ चा शुभारंभ केला. यातून आर्थिक साक्षरता वाढवली जाणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमातील वरील व्हिडिओ सध्या नेटवऱ्यांकडून व्हायरल केला जात आहे. अर्थमंत्र्यांच्या साधेपणाबद्दल कौतुकही केले जात आहे.