भाईंदरमध्ये भंगाराच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, एकाचा मृत्यू

| Updated on: Feb 28, 2024 | 4:09 PM

मुंबईतील भाईंदरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाईंदर येथील आझाद नगर परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भाईंदरमध्ये भंगाराच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, एकाचा मृत्यू
Follow us on

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : मुंबईतील भाईंदरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाईंदर येथील आझाद नगर परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. दीपक चौरसिया उर्फ पप्पू पानवाला असे मृत इसमाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या आझाद नगर परिसरातील भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास शॉर्टसर्किट मुळे आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या भीषण आगीमध्ये भंगाराच्या गोदामासह आसपासच्या भागातील पन्नासहून अधिक झोपड्या जळू खाक झाल्या.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. या आगीत एक इसम जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

 

आग विझववताना अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. कुलिंग करण्याचे काम सध्या सुरू अग्निशमन दलाकडून सुरू आहे. धुराचे लोळ परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.