छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतर झाल्याने एकिकडे शहरातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. नामांतरविरोधी संघटनांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे काल संभाजीनगरात घडलेल्या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये आणखी दहशत निर्माण झाली आहे. शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात शुक्रवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. फायनान्स आणि मल्टिसर्व्हिसेसच्या कार्यालयात दोन मास्कधारी व्यक्ती घुसले. येथील तरुणांना शिवीगाळ केली. चल अब पैसे निकाल म्हणत गोळीबार केला. पण सदर व्यक्तीने खिशातून 200 रुपयाची नोट काढली असता मास्कधारी व्यक्तीचा संताप झाला. त्याने तीच नोट ऑफिसमधील तरुणाच्या तोंडावर फेकली आणि बाहेर येऊन एक कार थांबवत त्या कारच्या काचेवर पिस्तूल मारली. शहरात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील एपीआय कॉर्नर परिसरात शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घटली. येथील पेट्रोल पंपाच्या मागे एका शटरमध्ये शुभम आणि विलास राठोड या भावांचे शुभम फायनान्स आणि मल्टिसर्व्हिसेस नावाने कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री विलास हे ऑफिसमध्ये होते. त्यावेळी एक मास्क घातलेला तरुण आता आला. त्यानं आधी शिवीगाळ केली. चल अब पैसे निकाल म्हणत कमरेला लावलेलं पिस्तूल काढलं. टेबलवर गोळीबार केला. घाबरलेल्या विलासने खिशातून २०० ची नोट काढली. ते पाहून मास्कधारी व्यक्तीचा संताप झाला. त्यानं ती नोट विलास यांच्या तोंडावर फेकून मारली आणि शिवल्या देत बाहेर येऊन एक कार थांबवली. कारच्या काचेवर पिस्तूल मारले. त्यालाही धमकावले. पैसे काढ म्हणाले.
या घटनेत पिस्तुलची स्पिंग तुटून स्प्रिंगसह गोळ्या खाली पडल्या. त्यामुळे त्याला गोळीबार करता आला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी दोघे कारमध्येच बसले होते. तर एकाने बाहेर येऊन हल्ला केला. परत निघताना एकजण पायी ठाकरेनगरकडे गेला तर इतर दोघे पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून एपीआय उड्डाणपूलाकडे गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हल्लेखोर गेल्यानंतर विलास राठोड यांनी 112 नंबरवर फोन करून गोळीबाराची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांची गाडी दाखल झाली. विलास राठोड यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला. हल्लेखोर शेजारच्या दुकानात सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेने पाच पथके रवाना केली आहेत. मात्र लुटमारीच्या उद्देशाने घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत माजली आहे.