जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज (25 जुलै) रात्री गोळीबार झाला आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरु
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार झाला. यात ते सुदैवाने बचावले. गोळीबारानंतर ते तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यांनी रितसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
जळगाव महापालिकेत सत्तांतरात पाटील यांचा मोठा वाटा
कुलभूषण पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने पुढे आले आहेत. जळगाव महापालिकेतील सत्तांतरात त्यांचा मोठा वाटा होता. याचमुळे त्यांना उपमहापौर पद मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज थेट त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला जातोय. या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे.ॉ
हेही वाचा :
अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ