‘मागेल त्याला हक्काचे घर’ योजनेचा पहिला प्रकल्प प्रत्यक्षात, अहमदनगरमध्ये सुविधांनी सुसज्ज असलेल्या घराचे लोकार्पण

| Updated on: Jun 15, 2021 | 5:25 PM

पंतप्रधान आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) मागेल त्याला हक्काचे घर ही संकल्पना अहमदनगर जिल्ह्यात प्रत्यक्ष साकारली आहे.

मागेल त्याला हक्काचे घर योजनेचा पहिला प्रकल्प प्रत्यक्षात, अहमदनगरमध्ये सुविधांनी सुसज्ज असलेल्या घराचे लोकार्पण
Follow us on

अहमदनगर : पंतप्रधान आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) मागेल त्याला हक्काचे घर ही संकल्पना अहमदनगर जिल्ह्यात प्रत्यक्ष साकारली आहे. सरकारी जागेवर राहात असलेल्या 60 कुटुंबाना सर्व सुविधांनी युक्त अशा सुसज्ज घरांचे आज लोकार्पण झाले आहे. (first project of ‘Magel Tyala Hakkache Ghar’ scheme in the Maharashtra, houses Allocated in Ahmednagar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे.. सरकारी जागेवर राहत असलेल्या गरीबांना कित्येक वर्षापासून घरकुल मिळत नव्हते. जागा स्वतःच्या नावे नसल्याने घरकुल मंजूर होत नव्हते, त्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करून महसुलची ही जागा रहिवाशांच्या नावे केली आणि आज प्रत्यक्ष पक्की घरं त्यांना अर्पण करण्यात आली आहेत. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेतून एका घरासाठी 1 लाख 20 हजार रुपये तसेच शौचालयासाठी प्रतिकुटुंब 12 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. त्यातच या प्रकल्पात प्राधान्याने गवंडी प्रशिक्षण योजनाही राबविण्यात आल्याने याच रहिवाशांना रोजगाराची संधी मिळाली. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आणि पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत रस्त्यांकरिता 45 लाख आणि भूमिगत गटारं आणि पाईपलाईनसाठी 5 लाख रुपये असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने हा गृहप्रकल्प सर्व सुविधांनी परिपूर्ण झाला आहे.

याच परिसरात विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी आणि समाज मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी 500 लीटर पाण्याची टाकी दिल्याने नळाद्वारे पाणी मिळण्याची सुविधा या कुटुंबांना उपलब्ध झाली आहे.

इतर बातम्या

आधी म्हणाले, संभाजीराजे पुढाकार घ्या, आता स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात सहभाग

आत्ताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, अजित पवारांनी प्रश्न निकाली काढला?

Video: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील?

(first project of ‘Magel Tyala Hakkache Ghar’ scheme in the Maharashtra, houses Allocated in Ahmednagar)