मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. त्यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. (Food and Drugs Administration Minister Rajendra Shingne tested corona Positive)
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— Dr.Rajendra Shingne (@DrShingnespeaks) February 16, 2021
राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना बाधित
काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांना 9 फेब्रुवारीला कोरोनाची (Corona) लागण झाली होती. सतेज पाटील यांनी त्याबाबत ट्विट करुन माहिती दिली. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.
माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) February 9, 2021
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं 2 फेब्रुवारीला समोर आलं होतं. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. अनिल देशमुख कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
गृहमंत्र्यांनंतर गृहराज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, सतेज पाटील कोरोनाबाधित
(Food and Drugs Administration Minister Rajendra Shingne tested corona Positive)