मुंबई : महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत महामोर्चाची घोषणा केली होती. मुंबईत हा महामोर्चा पार पडतोय. या मोर्चात कोण-कोण सहभागी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान या मोर्चात उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षही सहभागी झाले आहेत. मात्र, याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही सहभागी दिसून आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत रश्मी ठाकरे या देखील चालतांना दिसून आल्या आहेत. रश्मी ठाकरे पहिल्यांदाच मोर्चात सहभागी झालेल्या दिसून आल्याने त्याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रश्मी ठाकरे या देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत महामोर्चात चालतांना दिसून आल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा आनंद झाला होता.
पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झालेलं दुर्मिळ चित्र बघायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहे.
रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय होणार का ? अशी चर्चा अनेकदा समोर आली आहे. मात्र, उघडपणे कधीही रश्मी ठाकरे या सक्रिय होतांना दिसून आल्या नव्हत्या.
महाविकास आघाडीच्या महामोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्याने रश्मी ठाकरे यांचा राजकीय प्रवास सुरू होणार का ? रश्मी ठाकरे राजकारणात प्रवेश करणार का ? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.
महापुरुषांचा अवमान झाल्यानंतर राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधान केल्याने टीका सुरू होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महामोर्चाची घोषणा केली होती.
उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह पहिल्यांदाच या मोर्चात सहभागी होतांना दिसून आल्यानं राज्यातील हे दुर्मिळ चित्र चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाकरे यांच्या आजूबाजूला कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते मंडळीही दिसून येत असल्याने या महामोर्चाची चर्चा देशभरात होणार यामध्ये शंकाच नाही.